For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

2030 पासून स्वयंचलित आपत्कालीन ब्रेक होणार अनिवार्य

06:41 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
2030 पासून स्वयंचलित आपत्कालीन ब्रेक होणार अनिवार्य
Advertisement

1 ऑक्टोबर 2030पासून बाजारात येणाऱ्या सर्व नवीन गाड्यांमध्ये ही प्रणाली राहणार

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

मुंबई : जर कोणी अचानक तुमच्या गाडीसमोर आले, तर गाडी आपोआप ब्रेक लावून थांबेल. 1 ऑक्टोबर 2030 पासून बाजारात येणाऱ्या सर्व नवीन गाड्यांमध्ये ‘स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग प्रणाली’ मिळणार असल्याची माहिती आहे.  दरम्यान 1 ऑक्टोबर 2032 पासून बाजारात विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन आणि जुन्या गाड्यांमध्ये ही प्रणाली देणे आवश्यक असेल. रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि वाहनांची सुरक्षितता वाढवण्यासाठी परिवहन मंत्रालयाने हे सुरक्षा वैशिष्ट्या अनिवार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Advertisement

याव्यतिरिक्त, व्यावसायिक वाहनांमध्ये ड्रायव्हर स्लीप वॉर्निंग सिस्टीम (चालकाच्या झोपेची सूचना देणारी प्रणाली) देखील अनिवार्य केली जाईल, जी चालकाचे लक्ष विचलित झाल्यास त्याला सतर्क करेल. नवीन सरकारी नियम एआयएस-185 मानकाअंतर्गत लागू केले जातील.

सध्या हे फक्त   गाड्यांमध्ये उपलब्ध

सध्या, हे स्वयंचलित ब्रेकिंग वैशिष्ट्या फक्त अॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टीम तंत्रज्ञान असलेल्या महागड्या आणि प्रीमियम गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, भारतात वाहने आणि वाहतूक यांच्यातील कमी अंतरामुळे, अनेक लोक ते बंद ठेवतात, कारण त्यांना भीती वाटते की अचानक ब्रेक लावल्यास मागचे वाहन त्यांना धडक देईल. त्यामुळेच, नवीन नियमांनुसार, भारतीय रस्ते आणि वाहतुकीच्या वातावरणानुसार हे वैशिष्ट्या अधिक चांगले बनवण्याचा प्रस्ताव सरकार मांडत आहे. हे नियम लहान ट्रक आणि मालवाहू वाहनांनाही लागू होतात.

सरकार केवळ प्रवासी गाड्यांसाठीच नव्हे, तर 3.5 टनांपर्यंत माल वाहून नेणाऱ्या लहान व्यावसायिक वाहनांसाठीही नियम बदलणार आहे. 1 ऑक्टोबर 2028 पासून, जर कंपन्या कार आणि लहान मालवाहू वाहनांमध्ये स्वयंचलित ब्रेकचे वैशिष्ट्या देत असतील, तर त्यांना ते भारतीय मानकांनुसार बनवावे लागेल.

चालकाला झोप लागल्यास गाडी अलार्म वाजवेल

सरकारचा हा नवीन नियम (एआयएस-185) केवळ स्वयंचलित ब्रेकिंगपुरता मर्यादित नाही, तर तुमच्या सुरक्षिततेसाठी यात आणखी अनेक स्मार्ट वैशिष्ट्यो समाविष्ट आहेत:

चालकाला झोप आल्यास सूचना: 1 ऑक्टोबर 2029 पासून, बस, कॅब आणि व्यावसायिक वाहनांमध्ये एक अशी प्रणाली बसवणे बंधनकारक असेल, जी चालकाला झोप लागल्यास अलार्म वाजवून त्वरित सूचना देईल.

लेन कीपिंग सिस्टीम: हे तंत्रज्ञान 1 ऑक्टोबर 2029 पासून व्यावसायिक वाहनांमध्ये अनिवार्य असेल, जे वाहनाला रस्त्यावर आपल्या लेनमधून बाहेर जाण्यापासून रोखेल.

मुलांची सुरक्षितता आणि सामानाची सुरक्षितता: गाडी चालवताना स्टीअरिंग हाताळणे सोपे केले जाईल. यासोबतच, मुलांच्या बसण्यासाठी विशेष चाइल्ड-सीटची सुरक्षितता आणि अपघाताच्या वेळी वाहनात ठेवलेले सामान पुढे येऊन प्रवाशांना इजा होऊ नये, यासाठी कठोर नियम देखील लागू असतील. सर्वसामान्य जनता आणि कंपन्यांकडून 30 दिवसांच्या आत सूचना मागवल्या आहेत या नवीन नियमाच्या मसुद्यावर सरकारने जनता, वाहन कंपन्या आणि वाहन तज्ञांकडून 30 दिवसांच्या आत सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. सर्व मते आणि अभिप्राय विचारात घेतल्यानंतर सरकार अंतिम नियम लागू करेल.

Advertisement
Tags :

.