डिसेंबरमध्ये वाहन विक्रीचा धमाका ?
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टीव्हीएस आणि युनो मिंडा यांच्या निवडीला पसंती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2024 चा शेवटचा महिना वाहन क्षेत्रासाठी एका ग्रँड फिनालेपेक्षा कमी राहिला नाही. यामध्ये कार, दुचाकी, ट्रॅक्टर अशा सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत तेजीचा कल राहिला होता. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की डिसेंबर 2024 हे विक्रीचे वादळ राहिले आणि नवीन वर्षाची सुरुवात ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी धमाकेदार असणार आहे.
कारच्या विक्रीची संभाव्य स्थिती :
या वर्षी प्रवासी वाहने स्टार परफॉर्मर्स बनले. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने डिसेंबरमध्ये 67,900 वाहनांची विक्री करून 13 टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवण्याच्या तयारीत आहे, तर मारुती सुझुकीदेखील 1,55,000 युनिट्सच्या विक्रीसह 13 टक्क्यांची वाढ दर्शवेल. ह्युंडाई 57,000 वाहनांच्या विक्रीवर माफक 1 टक्के वाढ करेल, परंतु टाटा मोटर्सला 6 टक्क्यांची घसरण होऊ शकते.
दुसरीकडे, ट्रॅक्टरच्या विक्रीत प्रचंड जोम पाहायला मिळेल. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर्स 20,500 युनिट्सच्या विक्रीसह 7 टक्क्यांची वाढ नोंदवेल, तर एस्कॉर्ट्स (कुबोटासह) 6,250 युनिट्सच्या विक्रीसह 2 टक्केची किरकोळ वाढ नोंदवेल.
दुचाकी
या डिसेंबरमध्ये बाईकचा बाजार जोरात आहे. रॉयल एनफिल्ड 77,000 युनिट्सची विक्री करून 21 टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवेल, तर टीव्हीएस मोटर 3,30,000 युनिट्ससह 9 टक्क्यांची प्रभावी वाढ नोंदवेल. बजाज ऑटो मागे राहणार नाही आणि 3,40,000 युनिट्सची विक्री करून 4 टक्क्यांची वाढ नोंदण्याची अधिक शक्यता आहे. तसेच, हिरो मोटोकॉर्पला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो कारण त्याची विक्री 6 टक्क्यांनी कमी होऊ शकते.
व्यावसायिक वाहने
ट्रक आणि मोठ्या वाहनांची बाजारपेठ या डिसेंबरमध्ये थोडीशी स्थिर दिसत आहे. अशोक लेलँड 16,600 युनिट्सची विक्री करून 2 टक्क्यांची किंचित वाढ नोंदवेल, तर व्होल्वो-आयशर 8,000 युनिट्सच्या विक्रीसह आपली स्थिती कायम ठेवेल. तथापि टाटा मोटर्सला 1 टक्क्यांची माफक घसरण होऊ शकते.
तज्ञ काय म्हणतात?
नुवामाचे तज्ञ म्हणतात, ‘यंदा वर्षाचा शेवट प्रेक्षणीय असेल. प्रवासी कार आणि दुचाकींचा समावेश असेल. महिंद्रा अँड महिंद्रा, टीव्हीएस मोटर, रॉयल एनफिल्ड, सॅमिल आणि युनो मिंडा हे आमचे टॉप पिक्स आहेत.’ तर नववर्षही मोटारींच्या नेत्रदीपक विक्रीने साजरे केले जाणार असल्याचा अंदाज मांडला आहे.