For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

15 दिवसांत शहरातील ऑटोरिक्षा मीटरवर

06:55 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
15 दिवसांत शहरातील ऑटोरिक्षा मीटरवर
Advertisement

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : शहरातील ऑटोरिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध व प्रवाशांसाठी पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व ऑटोरिक्षा पुढील 15 दिवसांत अनिवार्यपणे मीटरनुसार चालविण्यात याव्यात. शहरात ऑटोरिक्षांचे भाडे सुऊवातीच्या 1.6 कि.मी. साठी 37 ऊपये व त्यानंतर प्रति कि.मी. 15 ऊपये या शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच आकारण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला.

Advertisement

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, शहरातील सर्व ऑटोरिक्षांमध्ये सुरू असलेले मीटर असणे आणि त्यानुसारच प्रवाशांकडून भाडे आकारले जावे, यासाठी परिवहन व वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवावी. खासगी वापरासाठी नोंदणी असलेल्या पांढऱ्या क्रमांकाची चारचाकी वाहने, दुचाकी तसेच रॅपिडोसारख्या वाहनांद्वारे व्यावसायिक प्रवासी सेवा देणे नियमबाह्या आहे. अशा वाहनांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

ऑटोरिक्षा चालकांनी प्रवाशांशी नम्रतेने वागावे व अवाजवी भाडे आकारू नये. शहरात कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीतही मीटर सक्तीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र काही ऑटोरिक्षा चालकांकडून अद्यापही नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना यापुढे नियमभंग करणाऱ्यांविऊद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागेश मुंडास यांच्यासह विविध ऑटोरिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक

शहरात नवीन ऑटोरिक्षांच्या नोंदणीला परवानगी देऊ नये. तसेच मुदत संपलेल्या किंवा अयोग्य ठरलेल्या ऑटोरिक्षांची फेरनोंदणी होणार नाही, यासाठी ऑटो संघटना व डीलर्स यांच्यासोबत बैठक घेण्यात यावी. अनेक वर्षांपासून नूतनीकरण न करता धावणाऱ्या ऑटोरिक्षांची ओळख पटवून त्यांची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यावरही भर देण्यात यावा. जनतेची सुरक्षितता व शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे

ऑटोरिक्षा चालकांनी प्रवाशांशी नम्रतेने वागावे

Advertisement
Tags :

.