मिरजेत एसटीच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर
मिरज :
कोल्हापूर रस्त्यावर महात्मा फुले चौकात एसटी आणि पॅगो रिक्षाची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये रिक्षातील चालकासह दोघे जखमी झाले. रिक्षाचाही चक्काचूर होऊन नुकसान झाले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू होते.
कोल्हापूर रत्स्यावर महात्मा फुले चौक येथे मालवाहू पॅगो रिक्षा (एमएच-०९-एफबी-२०९०) कोल्हापूरहून मिरजेकडे येत होती. याचेळी वळण रस्त्यावर कोल्हापूरकडे जाणारी एसटी (एमएच-०७-सी-७३३८) ची समोरासमोर धडक झाली. या धडकेत पॅगो रिक्षाचा चक्काचूर झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
या ठिकाणी धोकादायक वळण असून येथे स्पीड ब्रेकर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. अपघातावेळी मोठी गर्दी झाली होती. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू होते. गुन्हा मात्र दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.