For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑटो पार्ट्स कंपन्यांनी उत्पादन-उलाढाल वाढवावी

07:00 AM Sep 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑटो पार्ट्स कंपन्यांनी उत्पादन उलाढाल वाढवावी
Advertisement

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी भारतीय ऑटो पार्ट्स उत्पादकांना देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे विकसित देशांमध्ये आपला विस्तार करण्याचे आवाहन केले. आता जगभरात जाण्याची वेळ आली आहे. आपण जगभरात विस्तार करण्यास सुरुवात केली पाहिजे, ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या 66 व्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना पियुष गोयल बोलत होते.

Advertisement

याप्रसंगी भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर आणि दक्षिण आशियासाठीचे ब्रिटिश व्यापार आयुक्त तसेच पश्चिम भारतातील ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग हेही उपस्थित होते. गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या चार-पाच वर्षांत नऊ व्यापारी करारांवर स्वाक्षरी केली आहे, ज्यामध्ये भारत 38 विकसित देशांशी जोडला गेला आहे. ते म्हणाले की, या करारांमुळे अशा अर्थव्यवस्थांच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळाला आहे, ज्यांचा एकूण जीडीपी 60 लाख कोटी डॉलर्स आहे. त्यांनी याची तुलना 2014 पूर्वीच्या व्यापार करारांशी केली, ज्यांमध्ये सामील असलेल्या अर्थव्यवस्थांचा आजच्या किमतीनुसार एकूण जीडीपी सुमारे 1 ट्रिलियन डॉलर्स होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.