For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑटो एक्स्पो ठरणार बेळगावकरांसाठी पर्वणी

10:59 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑटो एक्स्पो ठरणार बेळगावकरांसाठी पर्वणी
Advertisement

22 पासून 4 दिवस प्रदर्शन

Advertisement

बेळगाव : यश इव्हेंट्स व बेळगाव कॉस्मो राउंड टेबल 370 आयोजित व व्हेगा हेल्मेट, कॅनरा बँक पुरस्कत ऑटो एक्स्पो सीपीएड मैदानावर दि 22 ते 25 फेब्रुवारीदरम्यान 4 दिवस आयोजित केले आहे. यामध्ये 220 स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे. ऑटो एक्स्पोमधील चार चाकी विभागात सुंदरम मर्सिडीज, बेंगळूर सेंट्रल ऑडी, वर्षा ऑटो कार बीएमडब्लू, सुतारिया महिंद्रा, कुमार मोटर्स, सिट्रॉन व व्होल्क्स वॅगन, माणिकबाग टाटा, शोधा टोयोटा, बीवायडी इलेक्ट्रिक यांचा सहभाग राहणार आहे. ऑटो एक्स्पोमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एडीएमएस, बी एम मोटर्स क्वांटम, बीगॉस, यश ऑटो अँपिअर, ओकाया, रवी मोटर्स, हिरो, निओ नाईस, हायटेक टीव्हीएस या कंपन्यांची इलेक्ट्रिक विविध प्रकारची दुचाकी वाहने तर गिअर हेड सायकल प्रदर्शित होणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक मोटारसायकलही या प्रदर्शनाचे खास आकर्षण राहणार आहे. प्रदर्शनात तात्काळ बुकींगवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे.

ऑटो एक्स्पोमधील दुचाकी विभागात जगजंपी बजाज, अरिहंत सुझुकी, हायटेक टीव्हीएस, सॅव्हसॉन यामाहा, कॉसमिक व्हेस्पाचा सहभाग राहणार आहे. अॅक्सेसरीज विभागात एस पी ऑटो एम टेक गार्ड, ऑटो गॅलरी, मिलन ऑटो सेंटर, बीपीसीएल व मोटूल ऑईल, सुरेश ऑटो सेंटर, एअर विंग्ज इंटरनॅशनलतर्फे विविध सुट्या पार्ट्सची मांडणी केली जाणार आहे. प्रदर्शनाचे वैशिष्ट्या म्हणजे येथे ड्रायव्हिंगच्या मार्गदर्शनासाठी भारत मोटर ड्रायव्हिंग स्कूल मार्गदर्शन करणार असून गोव्यातील पर्यटनाची माहिती हार्प बेवॉच रिसॉर्ट देणार आहे. ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल सोल्युशन्स, डिझाईन, टिकावू तंत्रज्ञानातील अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सचे अनावरण आणि श्रेणी पाहण्यास मिळणार असून ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या उक्रांतीचे प्रदर्शन करून इलेक्ट्रिक वाहने ते लक्झरी कारपर्यंत अत्याधुनिक ऑटोमोबाईल्सच्या प्रदर्शनात स्वत:ला मग्न करा. प्रदर्शनातील संजय घोडावत यांची लक्झरी वाहने आणि स्पोर्ट्स बाईक हे या एक्स्पोचे मुख्य आकर्षण आहे आणि बाईक स्टंट शो आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती अजिंक्य कालकुंद्रीकर, प्रकाश कालकुंद्रीकर व विनय कदम यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.