ऑटो कंपोनंट कंपन्या 30 हजार कोटींची करणार गुंतवणूक
आयसीआरएच्या अहवालामधून माहिती : मोठ्या विस्ताराच्या तयारीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या काही वर्षांत देशातील ऑटो कंपोनंट उद्योग वेगाने विस्तारणार आहे. कंपन्या केवळ त्यांची उत्पादन क्षमता वाढवणार नाहीत तर इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) सुटे भाग आणि प्रगत तंत्रज्ञानावर मोठी गुंतवणूक करण्याची तयारी करत आहेत. रेटिंग एजन्सी आयसीआरएच्या अहवालानुसार, ऑटो कंपोनंट कंपन्या पुढील आर्थिक वर्षात 25,000 ते 30,000 कोटी रुपये गुंतवूक करण्याची शक्dयाता आहे.
नवी गुंतवणूक, उत्पादन क्षमता
आयसीआरएच्या उपाध्यक्ष आणि सेक्टर हेड विनुता एसके यांच्या मते, ‘मोठ्या ऑटो कंपोनंट कंपन्या आर्थिक वर्ष 2025 मध्ये 15,000-20,000 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2026 मध्ये 25,000-30,000 कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखत आहेत.’ ही गुंतवणूक नवीन उत्पादन विकास, उत्पादन क्षमता वाढवणे आणि ईव्ही तंत्रज्ञानाचा अवलंब यामध्ये केली जाईल.
मोठी गुंतवणूक, लक्ष ईव्ही घटकांवर
रेटिंग एजन्सी आयसीआरएने म्हटले आहे की, ऑटो कंपोनंट उद्योगात गुंतवणूक वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे नवीन उत्पादनांचा विकास, विद्यमान प्लॅटफॉर्मसाठी तंत्रज्ञान अपग्रेडेशन आणि ईव्ही घटकांचा विस्तार. याशिवाय, कंपन्या आगामी नियामक बदलांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या प्लांटची क्षमता वाढवण्यावर देखील काम करत आहेत.
जागतिक बाजारपेठेत नवीन वाहनांच्या विक्रीत घट झाल्यामुळे भारतीय कंपन्यांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. परंतु एक चांगली बातमी देखील आहे-जागतिक कंपन्या आता त्यांच्या पुरवठादार बेसमध्ये विविधता आणत आहेत आणि आउटसोर्सिंग वाढवत आहेत, ज्यामुळे भारतीय कंपन्यांना नवीन ऑर्डर आकर्षित होण्याची शक्यता आहे.
मागणी वाढणार
उद्योगाच्या एकूण महसुलात 50 टक्केपेक्षा जास्त वाटा देणाऱ्या देशांतर्गत ऑटो कंपन्यांकडून मागणी पुढील दोन वर्षांत 7-10 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. आयसीआरए म्हणते की, कंपन्या आता उच्च दर्जाच्या घटकांवर आणि अधिक मूल्यवर्धनावर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यामुळे वाढीला चालना मिळेल. रिप्लेसमेंट मार्केट आणि निर्यात क्षेत्राची स्थिती जुन्या वाहनांसाठी ऑटो पार्ट्सची मागणी देखील सातत्याने वाढत आहे.