ऑटो कंपन्यांचे समभाग घसरणीत
07:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : गुरुवारी शेअरबाजारात ऑटो कंपन्यांचा समभाग असलेला निर्देशांक निराशाजनक कामगिरी करत बंद झाला. इंट्रा डे दरम्यान हा ऑटो निर्देशांक 2 टक्क्यापर्यंत खाली आला होता. यामध्ये महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग 4 टक्के घसरत 3322 रुपयांवर इंट्रा डे दरम्यान घसरले होते. गेल्या चार आठवड्यामध्ये पाहता हा समभाग जवळपास 12 टक्के घसरला आहे. दुसरीकडे दिग्गज मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचा समभागही 3 टक्के घसरत 14370 रुपयांवर आला होता. सलग सातव्या सत्रामध्ये हा समभाग घसरणीत राहिला.
Advertisement
Advertisement