रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान
बेळगाव :रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष म्हणून अमित साठ्यो, सचिव शैलेश मांगले व खजिनदार चेतन पै आणि त्यांचे सहकारी यांना अधिकार प्रदान करण्याचा समारंभ फौंड्री क्लस्टर येथे नुकताच झाला. इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून माजी प्रांतपाल शरद पै व प्रमुख पाहुणे म्हणून रमेश रामगुरवाडी उपस्थित होते. व्यासपीठावर मावळते अध्यक्ष संदीप नाईक व सचिव डॉ. संतोष पाटील उपस्थित होते.
संदीप नाईक यांनी अमित साठ्यो यांच्याकडे अधिकारसूत्रे प्रदान केली. त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गतवर्षातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रे स्वीकारल्यानंतर अमित साठ्यो यांनी पुढील वर्षातील आपल्या योजना सांगितल्या. रोटे. मनोज मायकल यांनी क्लबच्या सर्व उपक्रमात घेतलेला सहभाग व रोटरी फाऊंडेशनला दिलेला पाठिंबा याबद्दल त्यांना ‘आऊटस्टँडिंग रोटेरियन अवॉर्ड’ने गौरविण्यात आले.
क्लबचे संचालक म्हणून निरंजन संत, पराग भंडारे, सुदर्शन हुन्सवाडकर, दीपक काटवा, सचिन सबनीस, डॉ. सचिन माहुली, सचिन बिच्चू, पराग चिटणीस, संदीप नाईक, डॉ. मनीषा हेरेकर (प्रेसिडेंट इलेक्ट), सहसचिव यशवंत मोहता, उपाध्यक्ष प्रमोद अगरवाल व क्लब ट्रेनर म्हणून संजय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. शरद पै यांनी अधिकारसूत्रे दिल्यानंतर नूतन कार्यकारिणीला त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. सूत्रसंचालन मनवा हुन्सवाडकर व प्रीती भंडारे यांनी केले.