महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणिस्तानसमोर आज ऑस्ट्रेलियाचे खडतर आव्हान

06:04 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ किंग्सटाउन (सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडाइन्स)

Advertisement

आज रविवारी येथे टी-20 विश्वचषकाच्या सुपर एट स्तरावरील गट-1 च्या लढतीत अफगाणिस्तानची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी लागणार आहे. भारताच्या हातून 47 धावांनी दणदणीत पराभव झाल्याने आता अफगाणिस्तानवर केवळ विजयाची नोंद करण्याचाच नव्हे, तर त्यांची धावसरासरी सुधारण्याचाही दबाव असेल.

Advertisement

अफगाणिस्तान उणे -2.350 च्या धावसरासरीसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यात सुधारणा करण्याचे तसेच बांगलादेशचाही समावेश असलेल्या गटात गुणतालिकेत वर जाण्याचे खडतर आव्हान त्यांच्यासमोर आहे. रहमानुल्ला गुरबाज (178 धावा) आणि इब्राहिम झद्रान (160) हे अफगाणिस्तानच्या फलंदाजीत आघाडीवर आहेत. पण त्यांच्या मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी अधिक योगदान देण्याची गरज आहे.

फझलहक फाऊकी (15 बळी) आणि रशिद खान (9) या दोघांनीही अमेरिकेतील विविध खेळपट्ट्यांवर सातत्याने फलंदाजांसमोर अडचणी निर्माण केल्या आणि आता फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्याकामी ते महत्त्वपूर्ण ठरतील. अफगाणिस्तानने गट स्तरावर वेस्ट इंडिजच्या मागे दुसरे स्थान मिळविताना आपले अष्टपैलू कौशल्य दाखवले, परंतु सलग पाच विजय मिळविलेल्या 2021 च्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी त्यांना अव्वल खेळ करावा लागेल. दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना 2023 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात झाला होता. त्यावेळी मुंबईत ग्लेन मॅक्सवेलने एकहाती विजय मिळवून देताना सनसनाटी द्विशतक झळकावले होते.

सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article