For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडून एकदिवसीय क्रिकेटचा निरोप

06:50 AM Mar 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडून एकदिवसीय क्रिकेटचा निरोप
Advertisement

कसोटी तसेच टी-20 खेळणे कायम ठेवणार, निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ : स्मिथ

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, परंतु हा स्टार फलंदाज कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळत राहील.

Advertisement

दुखापतग्रस्त पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत विश्वविजेत्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या या 35 वर्षीय खेळाडूने सामन्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, तो तात्काळ 50 षटकांच्या स्वरूपातून निवृत्त होत आहे. आपल्या निर्णयावर भाष्य करताना स्मिथ म्हणाला की, 2027 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया स्वत:ला तयार करत असताना निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. हा एक उत्तम प्रवास राहिला आणि मला त्यातील प्रत्येक क्षण आवडला, असेही स्मिथ म्हणाला.

ऑस्ट्रेलियाच्या 2015 आणि 2023 च्या आयसीसी विश्वचषक विजेत्या संघातील एक महत्त्वाचा सदस्य राहिलेल्या स्मिथला 2015 आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम एकदिवसीय पुऊष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले होते आणि 2015 मध्ये त्याला आयसीसीच्या एकदिवसीय पुरुष संघात स्थान मिळाले होते. त्याने 2015 मध्ये एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि आपल्या शेवटच्या सामन्यात संघाचे नेतृत्व करून त्याने एकदिवसीय क्रिकेटचा निरोप घेतला.र्ग मोकळा करण्याची ही योग्य वेळ आहे,ठ तो म्हणाला.

170 एकदिवसीय सामने खेळलेला स्मिथ म्हणाला की, कसोटी क्रिकेट खेळणे अजूनही प्राधान्याने कायम राहणार आहे आणि जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीची आपण वाट पाहत आहे. 2010 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध लेगस्पिन टाकू शकणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून पदार्पण केल्यापासून स्मिथने 15 वर्षांहून अधिक काळात एक उत्तम छाप पाडली. गेल्या काही वर्षांत तो ऑस्ट्रेलियाच्या सर्वांत विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक बनला. स्मिथन 43.28 च्या सरासरीने 5 हजार 800 धावा केल्या, ज्यामध्ये 12 शतके आणि 35 अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याने 34.67 च्या सरासरीने 28 बळी घेतले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग आणि निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी स्मिथच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील प्रचंड योगदानाचे कौतुक करत त्याला मानवंदना दिली आहे. आम्ही भाग्यवान आहोत, कारण स्टीव्हला अजूनही कसोटी आणि टी-20 च्या क्षेत्रांत बरेच योगदान देता येण्यासारखे आहे आणि मी क्रिकेटमधील एका महान कारकिर्दीच्या पुढील टप्प्याचा साक्षीदार होण्यास उत्सुक आहे, असे ग्रीनबर्ग यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.