For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताविरुद्ध मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

06:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताविरुद्ध मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर
Advertisement

वनडे, टी 20, कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/सिडनी

भारतीय महिला क्रिकेट संघ फेबुवारी-मार्च दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांत वनडे, कसोटी आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाची सध्याची कर्णधार एलिसा हेली क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्यामुळे तिच्या जागेवर सोफी मोलिनेक्स हिच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Advertisement

एलिसा हेली सध्या भारतविरुद्धच्या वनडे आणि कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. पण ती टी 20 मालिका खेळणार नसल्याचे ऑस्ट्रेलियन बोर्डाने स्पष्ट केले. यामुळे नूतन कर्णधार मोलिनेक्स टी 20 मालिकेपासून नेतृत्वाची सुरुवात करेल. तसेच हेलीच्या निवृत्तीनंतर ती ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि कसोटी संघाचेही नेतृत्व हाती घेईल. भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला टी 20 मालिकेने 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल.

दरम्यान, सोफी मोलेनिक्स ही ऑस्ट्रेलिया महिला संघाची 21 वी कर्णधार ठरली आहे. तिच्यासमोर भविष्यात पहिले सर्वात मोठे आव्हान टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा असणार आहे. तथापि, ताहलिया मॅकग्रा ही ऑस्ट्रेलिया संघाची उपकर्णधार म्हणून कायम असेल, तिच्यासोबत ऍश्ले गार्डनरही असेल. दरम्यान, या मोठ्या बदलाशिवाय अन्य फारसे बदल ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आले नाही. अष्टपैलू निकोला कॅरेला वनडे आणि टी20 मालिकेसाठी पुन्हा ऑस्ट्रेलिया संघात संध मिळाली आहे. तसेच युवा लुसी हेमिल्टन हिला कसोटी संघात संधी मिळाली आहे. मात्र, दिग्गज मेगन शट हिला वनडे संघात स्थान मिळवण्यात अपयश आलेले आहे.

ऑस्ट्रेलिया माहिला संघ

टी 20 संघ - सोफी मोलिनेक्स (कर्णधार), अॅश्ले गार्डनर (उपकर्णधार), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, निकोला कॅरे, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.

वनडे संघ - एलिसा हेली (कर्णधार), सोफी मोलिनेक्स (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, निकोला कॅरे, अॅश्ले गार्डनर, किम गार्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया व्होल, जॉर्जिया वेअरहॅम

कसोटी संघ - एलिसा हेली (कर्णधार), सोफी मोलिनेक्स (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, अॅश्ले गार्डनर, किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.

Advertisement
Tags :

.