महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ‘आयपीएल’चा सर्वांत महागडा खेळाडू

06:56 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केकेआर’कडून 24.75 कोटींची बोली, पॅट कमिन्स ‘सनरायझर्स हैदराबाद’कडून 20.50 कोटींना करारबद्ध

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

मिचेल स्टार्कने त्याचा ऑस्ट्रेलियन संघातील गोलंदाजीतील सहकारी पॅट कमिन्सला मागे टाकून ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू बनण्याचा मान मंगळवारी येथे झालेल्या लिलावात मिळविला. त्याच्याठी चक्क 24.75 कोटी रुपयांची बोली लागली. ‘आयपीएल’च्या लिलावात वेगवान गोलंदाजांनी मोठी छाप उमटवली. कमिन्ससाठी देखील सनरायझर्स हैदराबादकडून 20.50 कोटींची अभूतपूर्व बोली लागल्यानंतर लगेच कोलकाता नाइट रायडर्सने डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कला करारबद्ध करताना वरील बोली लावली. स्टार्क 2015 साली आयपीएलमध्ये शेवटचा खेळला होता.

‘आयपीएल’चा लिलाव नेमका कसा होईल हे सांगता येत नसते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन वेगवान त्रिकूटातील एक असलेल्या जोश हेझलवूडला लिलावाच्या पहिल्या फेरीत कुणीच करारबद्ध केले नाही. त्याची आरंभ बोली 2 कोटी रुपयांची होती. गुजरात टायटन्स आणि केकेआर यांच्यात स्टार्कसाठी दीर्घकाळ बोली युद्ध चालले आणि शेवटी त्याला विक्रमी बोली लावून आपल्या संघात खेचण्यात ‘केकेआर’ने यश मिळविले. 33 वर्षीय स्टार्कने सहसा आयपीएलपेक्षा आपल्या संघातून कर्तव्य बजावण्यास प्राधान्य दिलेले आहे. परंतु यावेळी ‘आयपीएल’नंतर होणाऱ्या ‘टी-20’ विश्वचषकावर नजर ठेवून त्याने लिलावासाठी उपलब्ध होण्याचा निर्णय घेतला.

स्टार्क हा ‘आयपीएल’चे फक्त दोनच मोसम खेळलेला असून 27 सामन्यांत 20.38 च्या सरासरीने त्याने 34 बळी घेतलेले आहेत. याउलट, कमिन्स हा आयपीएलमध्ये नियमित खेळत आलेला आहे परंतु अॅशेस आणि एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने 2023 च्या ‘आयपीएल’मध्ये खेळणे टाळले. कमिन्ससाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जोरदार शर्यत लागली. पण या वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला आपल्या बाजूने आणण्यात सनरायझर्स हैदराबादने यश मिळविले. गेल्या वर्षी पंजाब किंग्सने इंग्लंडच्या सॅम करनसाठी 18.5 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. यावेळी कमिन्सला करारबद्ध करताना सनरायझर्स हैदराबादने त्याहून जास्त बोली लावली.

गोलंदाजांची छाप

आयपीएल लिलावात कमिन्ससाठी मोठी बोली लागण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. 2020 च्या स्पर्धेपूर्वी ‘केकेआर’ने त्याला 15.5 कोटी ऊपयांना करराबद्ध केले होते. कमिन्सच्या व्यतिरिक्त, सनरायझर्सने ‘वर्ल्ड कप’च्या फायनलमधील ऑस्ट्रेलियाचा हिरो ट्रॅव्हिस हेडला 6.80 कोटी ऊपयांची बोली लावून करारबद्ध केले आहे. मोठी बोली लागून करारबद्ध झालेल्या वेगवान गोलंदाजांमध्ये हर्षल पटेल (पंजाब किंग्सकडून 11.75 कोटी ऊपये), अल्झारी जोसेफ (आरसीबीकडून 11.50 कोटी), उमेश यादव (गुजरात टायटन्सकडून 5.80 कोटी) आणि शिवम मावी (एलएसजीकडून 6.40 कोटी ऊपये) यांचाही समावेश आहे. लिलावापूर्वी आरसीबीने हर्षलला मोकळे केले होते. भारतीय संघात त्याची निवड करण्याच्या दृष्टीने फारशी अनुकूलता दाखविण्यात आलेली नसली, तरी पंजाब किंग्सने मात्र मोठी बोली लावून त्याला खेचले.

मिचेल ‘सीएसके’कडे, तर हेड ‘सनरायझर्स’कडे

फलंदाजांत डॅरिल मिचेलला भरपूर मागणी येऊन चेन्नई सुपर किंग्सने न्यूझीलंडच्या या फलंदाजासाठी 14 कोटी रुपये खर्च केले. ट्रेव्हिस हेड, ज्याने भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून देणारे शतक झळकावले आणि त्यापूर्वी ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम फेरीत भारताला हरविण्यात मोठी भूमिका बजावली, त्याला आपल्या बाजूने आणण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मोठे बोली युद्ध झाले. अखेर 2016 साली विजेते राहिलेल्या सनराझर्सने या यष्टिरक्षक फलंदाजाला करारबद्ध करण्यात यश प्राप्त केले.

रचिन रवींद्र‘सीएसके’, तर पॉवेल ‘राजस्थान’कडून करारबद्ध

न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्रवरही साऱ्यांची नजर होती. त्याची आरंभ बोली 50 लाख ऊपये होती. त्याला ‘चेन्नई सुपर किंग्स’ने तुलनेने माफक म्हणजे 1.8 कोटी ऊपयांना करारबद्ध केले. भारतात नुकत्याच झालेल्या विश्वचषकात रवींद्र भरपूर चमकला होता. वेस्ट इंडिजचा टी-20 कर्णधार रोव्हमन पॉवेल हाही राष्ट्रीय संघांतर्फे खेळणाऱ्या फलंदाजांमधील सर्वांत महागडा खेळाडू म्हणून उदयास आला. त्याला 7.40 कोटी ऊपयांना राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केले. पॉवेलची आरंभ बोली 2 कोटी ऊपये होती. या मिनी लिलावात बोली लागलेला तो पहिला खेळाडू होता. 2024 च्या हंगामासाठी त्याला आपल्या संघात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने तीन संघांनी उत्सुकता दाखवली होती. अखेरीस, राजस्थान रॉयल्सला हा मोठा हिटर प्राप्त झाला. तो कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्यांच्या संघ बार्बाडोस रॉयल्सचा कर्णधार देखील आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, भारताचा मनीष पांडे आणि रिली रॉसौ यांना कुणी करारबद्ध केले नाही, तर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने 4 कोटी रुपयांची बोली लावून घेतले. दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्सनें करारबद्ध केलेले असून त्याच्यासाठी 5 कोटी रुपयांची बोली त्यांनी लावली, तर भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर 4 कोटी रुपयांच्या बोलीवर ‘सीएसके’कडे परतला आहे. भारताबाहेर पहिल्यांदाच हा लिलाव झाला.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article