For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

06:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/मेलबोर्न

Advertisement

येत्या फेब्रुवारी महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरूवारी 15 सदस्यांचा ऑस्ट्रेलियन संघ जाहीर केला. दरम्यान या संघामध्ये जोश हॅजलवूड आणि टीम डेव्हिड यांचे पुनरागमन झाले असून कूपर कोनोली याचा संघात समावेश करुन अनपेक्षित धक्का दिला आहे.

या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची गैरहजेरी चांगलीच जाणवेल. 2021 साली या स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये मिचेल स्टार्कची कामगिरी दर्जेदार झाली होती. पण गेल्या वर्षी मिचेल स्टार्कने टी-20 प्रकारातून अनपेक्षित निवृत्तीचा निर्णय घेतल्याने आता त्याच्या जागी कूपर कोनोलीला संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या आयसीसीच्या यापूर्वीच्या सहा विश्वचषक टी-20 स्पर्धांपैकी केवळ एका स्पर्धेत स्टार्कचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश नव्हता.

Advertisement

भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. जर या स्पर्धेची त्यांनी सुपर-8 फेरी गाठली तर ऑस्ट्रेलियन संघाला भारतात यावे लागेल. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा सलामीचा सामना 11 फेब्रुवारीला आयर्लंडबरोबर कोलंबोत होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना झिम्बाब्वेबरोबर 13 फेब्रुवारीला कोलंबोत त्यानंतर 16 फेब्रुवारीला त्यांचा पुढील सामना सहयजमान लंकेबरोबर कॅन्डीमध्ये तर 20 फेब्रुवारीला त्यांचा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना ओमानबरोबर होणार आहे.

या महत्त्वाच्या स्पर्धेत संघाचा नियमीत कर्णधार पॅट कमिन्सचे पुनरागमन होणार किंवा नाही याबाबत चालु महिन्याच्या अखेरीस निश्चित समजू शकेल. मात्र सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घोषित केलेल्या 15 सदस्यांच्या ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व मिचेल मार्शकडे सोपविण्यात आले आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सध्या घोषित करण्यात आलेल्या संघामध्ये आयसीसीच्या नियमानुसार बदल करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी राहील. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका चालू महिन्याच्या अखेरीस पाकबरोबर खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघ : मिचेल मार्श (कर्णधार), बार्टलेट, कुपर कोनोली, कमिन्स, डेव्हिड, ग्रीन, इलिस, हॅजलवूड, हेड, इंग्लीस, कुहेनमन, मॅक्सवेल, शॉर्ट, स्टोईनीस आणि झम्पा.

Advertisement
Tags :

.