महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऑलिम्पिक खेळण्यासाठी चक्क बोटाचा बळी!

06:03 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्ट्रेलियन हॉकीपटूचे अनोखे धाडस : हॉकीपटू मॅट डॉसनच्या जिद्दीला सलाम : तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी घेतला कठोर निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था /सिडनी, ऑस्ट्रेलिया

Advertisement

खेळ म्हटले की दुखापती आल्या, चढउतार आले. फुटबॉल असो व अन्य कोणताही खेळ असो, कोणत्याही खेळाडूची एखाद्या खेळासाठीची क्रेझ कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकते, याचे ताजे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियन हॉकीपटू मॅट डॉसन. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी डॉसनने चक्क आपल्या बोटाचा बळी दिला आहे. ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघात खेळणाऱ्या 30 वर्षीय डॉसनला अलीकडेच उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. यावेळी त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. बोटाची दुखापत गंभीर असल्यामुळे सर्जरी करावी लागेल व यासाठी किमान दोन आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागेल असे डॉक्टरांचे उत्तर आले. बोटाच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो सहभागी होईल की नाही अशी शंका होती. पण डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याने बोटाचा वरचा भाग कापण्याचा निर्णय घेतला. डॉसनसाठी हा निर्णय कठीण होता पण ऑलिम्पिक खेळणे स्वप्न असल्यामुळे त्याने हा निर्णय हसतखेळत स्वीकारला.

तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये होणार सहभागी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक संघाचा सदस्य असलेल्या डॉसनसमोर बोटाला प्लास्टर लावणे किंवा बोटाचा काही भाग कापणे, असे दोन पर्याय होते. प्लॅस्टर लावण्याचा निर्णय घेतला असता, तर त्याला कदाचित ऑलिम्पिकला मुकावे लागले असते. पण ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा निर्धार असल्याने डॉसनने दुसरा  पर्याय निवडला. डॉसनवर मागील आठवड्यात शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर तो आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा ऑस्ट्रेलियन हॉकी संघाचे प्रशिक्षक कॅलिन बॅच यांनी दिला आहे. डॉसन याआधी 2016 रिओ व 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता.

उजव्या हाताच्या बोटाचा वरचा भाग कापणे, हे माझ्यासमोर कठीण आव्हान होते. पॅरिस ऑलिम्पिक समोर होते व तिसऱ्यांदा मला या स्पर्धेत सहभागी सहभागी व्हायचे होते. अखेरीस धाडसाने मी हा निर्णय घेतला असून ऑस्ट्रेलियन संघासाठी मला स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.

मॅट डॉसन, ऑस्ट्रेलियन हॉकीपटू.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article