महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा रविवारपासून

06:00 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिनेर, जोकोव्हिच परस्पर विरोधी गटात, साबालेंकाची सलामी स्टिफेन्सशी

Advertisement

वृत्तसंस्था/मेलबोर्न

Advertisement

2025 च्या टेनिस हंगामातील येथे येत्या रविवारपासून पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. नव्या वर्षाच्या टेनिस हंगामातील ही पहिली स्पर्धा असून पुरुष आणि महिला एकेरीचा ड्रॉ काढण्यात आला. पुरुष विभागात इटलीचा विद्यमान विजेता आणि टॉप सिडेड जेनिक सिनेर आणि सर्बियाचा अनुभवी नोव्हॅक जोकोव्हिच हे परस्पर विरोधी गटात आहेत. महिला एकेरीमध्ये साबालेंकाचा सलामीचा सामना स्टिफेन्सबरोबर होणार आहे.

गेल्यावर्षी या स्पर्धेमध्ये जोकोव्हिच आणि सिनेर यांच्यात उपांत्यफेरीचा सामना झाला होता. पण यावेळी या स्पर्धेमध्ये याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता फेटाळण्यात आली होती. इटलीच्या सिनेरने उपांत्य सामन्यात गेल्या वर्षी जोकोव्हिचचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर अंतिम सामन्यात सिनेरने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेव्हचा पराभव करत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील पहिले ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविले होते. पुरुष एकेरीच्या काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार टॉपसिडेड सिनेरचा पहिल्या फेरीतील सामना निकोलास जेरीबरोबर होणार आहे. या स्पर्धेचा काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार सिनेरच्या गटात अमेरिकेचा टेलर फ्रिज, बेन शेल्टन आणि मेदव्हेदेव यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या टेलर फ्रिजचा सलामीचा सामना अमेरिकेच्या जेनसन ब्रुक्सबायबरोबर होणार आहे. सिनेरला त्याच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत कदाचित स्पेनच्या तृतिय मानांकित कार्लोस अल्कारेझशी लढत द्यावी लागेल. तर उपांत्य फेरीत त्याची लढत रशियाच्या व्हेरेव्हबरोबर होऊ शकेल.

गुरुवारी काढण्यात आलेल्या पुरुष आणि महिला एकेरीच्या ड्रॉमध्ये सिनेर आणि आर्याना साबलेंका यांना मानांकनात टॉप सिडींग देण्यात आली आहे. सिनेर आणि साबालेंका हे या स्पर्धेतील विद्यमान विजेते आहेत. महिलांच्या विभागात साबलेंकाने गेल्या वर्षी या स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळविताना झेंग क्विनवेनचा 6-3, 6-2 असा पराभव केला होता. साबलोंका आता यावेळी जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदविण्यासाठी सज्ज झाली आहे. स्विसच्या मार्टिना हिंगीसने 1997 ते 1999 या कालावधीत सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम

स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. साबालेंका या विक्रमाशी यावेळी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. साबालेंकाचा सलामीचा सामना यावेळी स्लोनी स्टिफेन्सबरोबर होणार आहे. 2017 साली स्टिफेन्सने अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. साबालेंकाच्या गटामध्ये 17 वर्षीय मिरा अॅन्ड्रीव्हा तसेच झेंग यांचा समावेश आहे. साबालेंकाला उपांत्यफेरीत यावेळी कदाचित अमेरिकेच्या तृतिय मानांकित कोको गॉफशी लढत द्यावी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र गॉफला पहिल्या फेरीत माजी ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेत्या सोफिया किनेनशी मुकाबला करावा लागेल. जपानची नाओमी ओसाका, सातवी मानांकित जेसीका पेगुला, द्वितीय मानांकित स्वायटेक, इलिना रायबाकिना यांचा साबालेंकाच्या विरोधी गटामध्ये समावेश आहे.

नागलची सलामी मॅकहेकशी

ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होणार असून पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविणारा भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागल याचा सलामीचा सामना जेक प्रजासत्ताकच्या टॉमस मॅकहेकबरोबर होणार आहे. 27 वर्षीय नागल एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत 96 व्या स्थानावर आहे. नागलने गेल्यावर्षी या स्पर्धेत पहिल्या फेरीमध्ये कझाकस्थानच्या बुबलीकचा पराभव केला होता. पण त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याला चीनच्या सेंगकडून पराभव पत्कारावा लागला. त्याच प्रमाणे सध्या सुरू असलेल्या ऑकलंड एएसबी क्लासीक टेनिस स्पर्धेत नागलचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आले आहे. डेव्हिस चष्घ्क टेनिस स्पर्धेत यावेळी नागलने सहभागी होण्यास नकार दर्शविला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article