For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्टेलिया संघ पकिस्तानच्या दौराऱ्यावर

06:17 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्टेलिया संघ पकिस्तानच्या दौराऱ्यावर
Advertisement

लाहोरमध्ये खेळावणार टी-20 समाने

Advertisement

वृत्तसंस्था / लाहोर

मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघ बुधवारी सकाळी लाहोरमध्ये दाखल झाला,ज्यात शेवटचे दोन समाने 31 जानेवारी आणि 1 फेब्रवारी रोजी होणार आहेत.

Advertisement

क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील  पुढील महिन्याच्या विश्वचषकातील सहभागबद्दल शंका असतानाही, पकिस्तान गुरुवारी लाहोरमध्ये सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मलिकेत ऑस्टेलियाशी भिडणार आहे.देशाचे क्रिकेट प्रमुख मोहसिन नक्वी या मोठ्या स्पर्धेत भाग घेण्याबाबत अंतिम निर्णय शुक्रवार किंवा सोमवारी जाहीर करतील.पकिस्तान मागिल आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या (आयसीसी) निर्णयाचा निषेध करत आहे, ज्याने सुरक्षेच्या भीतीमुळे बांगलादेशची  सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी फेटाळून लावली होती.20 संघांच्या या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे, जी स्पर्धा 7 फेब्रवारी ते 8 मार्च दरम्यान श्रीलंकेच्या सह-यजमानपदात होणार आहे.

Advertisement
Tags :

.