For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाची सलामी आज ओमानविरुद्ध

06:22 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाची सलामी आज ओमानविरुद्ध
Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन

Advertisement

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 50 षटकांच्या सामन्यांचा विश्वचषक आधीच जिंकलेला ऑस्ट्रेलिया एकाच वेळी तिन्ही विश्वविजेतेपदे पटकावणारा पहिला संघ बनण्याचा हेतू बाळगून आज गुरुवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या त्यांच्या सलामीच्या सामन्यात उतरेल. आज ओमानविरुद्धच्या सामन्याने ते आपली मोहीम सुरू करतील.

वरील पराक्रम करण्यासाठी ऑस्ट्रेलिया त्यांच्या अनुभवी खेळाडूंवर अवलंबून असेल. ऑस्ट्रेलियाचे आधुनिक युगातील अनेक महान खेळाडू या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याची तयारी करत आहेत. टी-20 विश्वचषकाने ऑस्ट्रेलियाला बराच काळ हुलकावणी दिली. परंतु 2021 मधील पहिल्या विजेतेपदाने ते बदलले. तथापि, एक वर्षानंतर घरच्या भूमीवर झालेल्या स्पर्धेत साखळी फेरीच्या पुढे त्यांना प्रगती करता आली नाही.

Advertisement

मात्र नवनियुक्त कर्णधार मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅचविनर्सची कमतरता नाही. हा अष्टपैलू खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येतो आणि तो महत्त्वाचा घटक राहील. ट्रॅव्हिस हेड फॉर्ममध्ये आहे आणि तो जागतिक कसोटी स्पर्धेच्या तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या अंतिम लढतींत संघाचा स्टार परफॉर्मर राहिला होता.

ऑस्ट्रेलियातर्फे लेगस्पिनर अॅडम झाम्पा महत्त्वाची भूमिका बजावेल. डावखुरा फिरकीपटू अॅश्टन आगरही संघात असेल अशी अपेक्षा आहे. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे नेहमीचे विश्वसनीय त्रिकूट वेगवान मारा सांभाळेल. दुसरीकडे, ओमानने नामिबियाविऊद्धचा पहिला सामना गमावलेला आहे. सदर सामना सुपर ओव्हरमध्ये नेताना त्यांच्या गोलंदाजांनी प्रशंसनीय कामगिरी केली. मात्र त्यांच्या फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागेल.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वा.

Advertisement

.