कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलिया : मजूर पक्षाचा विजय निश्चित

06:05 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / कॅनबेरा

Advertisement

ऑस्टेलियन संसदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी मजूर पक्षाचा पुन्हा विजय झाला आहे. या पक्षाला बहुमत मिळेल असे बहुतेक सर्व मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये दिसून आले आहे. या निवडणुकीचा परिणाम अधिकृतपणे आज रविवारी घोषित केला जाणार आहे. मात्र, विद्यमान नेते अँथोनी अल्बानेस यांचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल हे निश्चित मानले जात आहे. शनिवारी संध्याकाळी मतगणनेस प्रारंभ झाला असून प्रारंभीच्या कलांमध्ये मजूर पक्ष आघाडीवर आहे.

Advertisement

शनिवारी ऑस्ट्रेलियात मतदान पार पडले. त्यानंतर त्वरित मतगणनेस प्रारंभ करण्यात आला. दुपारी 3 वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर चार वाजता मतगणनेस प्रारंभ करण्यात आला. भारतीय प्रमाणवेळेनुसार मतगणना शनिवारी रात्री बाराच्या नंतर पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अल्बानेस यांचा विक्रम

अल्बानेस यांचा पक्ष विजयी होऊन ते पुन्हा देशाचे नेते झाल्यास तो एक विक्रम होणार आहे. 2004 पासून ऑस्ट्रेलियात कोणत्याही नेत्याने सलग दोनदा सत्ता मिळविलेली नाही. मजूर पक्षासाठीही हा विजय विक्रमी ठरणार आहे. मजूर पक्षाला किती जागा मिळतात एवढाच प्रश्न आता उरला आहे, असे तज्ञांचे मत आहे.

विरोधी पक्षनेते पराभूत होणार

कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पीटर डट्टन हे स्वत:च्या मतदारसंघातून पराभूत होतील, असे भाकित सर्वेक्षणांमधून करण्यात आले आहे. तसे झाल्यास तो ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षासाठी मोठा धक्का असेल. डट्टन यांनी स्वत:ची शांत आणि विचारी प्रतिमा या निवडणुकीत पुढे केली होती. तथापि, त्यांच्या पक्ष प्रचारात कमी पडला, असे तेथील पत्रकारांचे आणि तज्ञांचे मत आहे. त्यांच्या पक्षाचा पराभव झाला, तरी तो फार मोठ्या अंतराने होणार नाही. कारण मतदान चुरशीने झाले आहे, असेही अनेक सर्वेक्षणांमधून दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article