For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशला दे धक्का

06:44 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशला दे धक्का
Advertisement

दुसऱ्या टी 20 सामन्यात यजमान संघ 7 धावांनी पराभूत : सामनावीर मॅट रेनशॉची नाबाद 89 धावांची खेळी 

Advertisement

वृत्तसंस्था/ चितगाव

मॅट रेनशॉच्या (नाबाद 89) धमाकेदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात बांगलादेशवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयासह कांगारुंनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 बाद 196 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला 6 बाद 189 धावापर्यंत मजल मारता आली. आता, उभय संघातील तिसरा व औपचारिक सामना दि. 21 रोजी चितगाव येथे खेळवण्यात येईल.

Advertisement

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार मिचेल मार्श 20 धावा करुन बाद झाला. जोस इंग्लिश (11) आणि कॉनोली (1) यांनी देखील निराशा केली. सलामीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर मॅट रेनशॉ आणि टीम डेव्हिड यांनी 97 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. रेनशॉने शानदार खेळी साकारताना 52 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारासह नाबाद 89 धावा फटकावल्या. डेव्हिडने 45 धावा करत त्याला चांगली साथ दिली.  डेव्हिड बाद झाल्यानंतर निखिल चौधरी 8 धावा करुन माघारी परतला. यानंतर रेनशॉने मात्र संयमी खेळी करत संघाला 196 धावापर्यंत मजल मारुन दिली.

विजयासाठीच्या 197 धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला 6 बाद 189 धावापर्यंत मजल मारता आली. बांगलादेशकडून सैफ हसनने सर्वाधिक 42 धावा फटकावल्या. परवेज होसेनने 36 तर तौहिदने 35 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे बांगलादेशला 7 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 5 बाद 196 (इंग्लिश 11, मिचेल मार्श 20, कॉनोली 1, रेनशॉ 52 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार नाबाद 89, टीम डेव्हिड 45, निखिल चौधरी 8, डेव्हिस नाबाद 13, अहमद 2 बळी, नाहिद राणा, मुस्तफिजुर रेहमान आणि अब्दुल सकलेन प्रत्येकी 1 बळी)

बांगलादेश 20 षटकांत 6 बाद 189 (तानझिद हसन 30, सैफ हसन 42, परवेज होसेन 36, तौहिद 35, अब्दुल सकलेन 11, अॅरोन हार्डी 2 बळी, नॅथन एलिस, रेनशॉ, झाम्पा आणि डेव्हिस प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.