महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलिया अ महिला संघाचा सलग दुसरा विजय

06:10 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/मॅके

Advertisement

भारतीय महिला अ क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील खेळविण्यात आलेल्या वनडे मालिकेतील शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ महिला संघाचा 58 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात नाबाद शतक झळकविणाऱ्या मॅडी डार्कला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवून मालिका सिलबंद केली आहे.

Advertisement

या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून भारत अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय अ संघाचा डाव 48 षटकात 218 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने 40.2 षटकात 2 बाद 221 धावा जमवित विजय नोंदविला.

भारत अ संघाच्या डावामध्ये तेजल हसबनीस आणि राघवी बिस्त यांनी शानदार अर्धशतके झळकविली. हसबनीसने 86 चेंडूत 4 चौकारांसह 63 तर बिस्तने 93 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 70 धावा जमविल्या. भारत अ संघातील उवर्लरित फलंदाज लवकर बाद झाले. शुभा सतीशने 1 चौकारासह 34, शिप्रा गिरीने 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. हसबनीस आणि बिस्त यांनी चौथ्या गड्यासाठी 124 धावांची भागिदारी केली. भारत अ संघाचे शेवटचे 8 गडी 42 धावांत तंबूत परतले. ऑस्ट्रेलिया अ संघातर्फे ब्राऊन, हेनकॉक, नॉट यांनी प्रत्येकी 2 तर व्हॅलेमिनेक आणि पार्सन्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

 

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलिया अ संघाच्या डावात मॅडी डार्कने 115 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 106 धावा झळकविताना सलामीच्या मॅकसमवेत 131 धावांची शतकी भागिदारी केली. मॅकने 78 चेंडूत 5 चौकारांसह 68 तर तेहिलाने 26 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 32 धावा जमविल्या. भारतातर्फे सायली सत्तीगेरी आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : भारत अ 48 षटकात सर्व बाद 218 (राघवी बिस्त 70, हसबनीस 63, शुभा सतीश 24, गिरी 17, ब्राऊन, नॉट, हेनकॉक प्रत्येकी 2 बळी, व्हॅलेमिनेक आणि पार्सन्स प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया अ 40.2 षटकात 2 बाद 221 (मॅडी डार्क नाबाद 106, मॅक 68, नॉट 9, तेहिला नाबाद 32, सायली सत्तीगेरी व कंवर प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article