For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फिरकीपटूंमुळे ऑस्ट्रेलिया ए चे भारत ए वर वर्चस्व

06:33 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
फिरकीपटूंमुळे ऑस्ट्रेलिया ए चे भारत ए वर वर्चस्व
Advertisement

ची अवस्था 5 बाद 122 अशी केली.

Advertisement

ऑफ स्पिनर टॉड मर्फी आणि कोरी रोचिचिओली यांनी तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. भारत ए अजूनही 236 धावांनी पिछाडीवर आहे. चष्मा लावणाऱ्या मर्फीने सलामीवीर साई सुदर्शन (8) आणि जिद्दी डटावखुरा फलंदाज यश राठोड (15) यांना बाद केले. तर रोचिचिओलीने कर्णधार देवदत्त पडिक्कल (31) याची विकेट घेत यजमानांची कोंडी केली. दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा शेख रशीद (36) आणि तनुष कोटियन (6) मैदानावर होते.

डावाच्या सुरुवातीला, वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनने पहिल्याच षटकांत सलामीवीर आयुष पांडेला कॉट बिहाईंड बाद केले. त्यानंतर डावखुरे फलंदाज सुदर्शन आणि पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागिदारी केली. मात्र अवव्या 54 धावांची भर पडत असतानाच भारत ए ने सुदर्शन, पडिक्कल आणि राठोड या तिघंच्या विकेट्स गमावल्या. त्यानंतर पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा कुमार कुशाग्रह वेगवान मध्यगती गोलवंदाज लियाम स्कॉटच्या गोलंदाजीवर एलपीडब्ल्यू झाला. ज्यामुळे यजमान संघ मोठ्या संकटात सापडला. येथे झालेला पहिला स ामना 162 धावांनी जिंकणाऱ्या भारत अ संघासमटोर तिसऱ्या दिवशी मोठे आव्हान असेल. कारण, आदल्या दिवशी 7 बाद 282 धावांवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आपला पहिला डाव 358 धावांपर्यंत नेला. शतकवीर हार्पर आणि झाय रिचर्डसन (319ब् या जोडीने आठव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी  केली. पाहुण्या संघाने पहिले सत्र यशस्वीपणे खेळून काढले. दुपारच्या जेवणानंतर 20 मिनिटांनी त्यांचा डाव संपुष्टात आला. मध्यगती गोलंदाज अंशुल कंबोजने सलग चेंडूंवर हार्पर (128) आणि नवीन फलंदाज लियाम हॅचर यांना बाद केले.

Advertisement

संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया अ 116.3 षटकांत सर्वबाद 358 (सॅम हार्पर 128, अंशुल कंबोज 3-34, नचिकेत भुते 3-44, शम्स मुलानी 3-92), विरुद्ध भारत अ 51 षटकांत 5 बाद 122.

Advertisement
Tags :

.