महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वृद्धाचे शुभमंगल की अमंगल?

10:54 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

90 व्या वर्षी 40 वर्षीय महिलेशी लग्न : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाकडून फिर्याद

Advertisement

बेळगाव : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला वृद्धापकाळात मदत करण्याच्या बहाण्याने शहापूर येथील एका महिलेने त्याच्याशी लग्न केले आहे. 90 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याबरोबर 40 वर्षीय महिलेने लग्नगाठ बांधली असून त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी सध्या संबंधित महिलेविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. सरस्वतीनगर, पाईपलाईन रोड, गणेशपूर परिसरात एक 90 वर्षीय निवृत्त लेफ्टनंट कर्नल जगत्नरेन सिंग राहतात. वयोमानामुळे त्यांना नीट चालताही येत नाही. त्यामुळे ते घरीच राहतात. हीच संधी साधून कोरे गल्ली, शहापूर येथील एका महिलेने त्या निवृत्त अधिकाऱ्याचे घर गाठून त्यांच्याशी लग्न केल्याचे सामोरे आले आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर येथील पूनम (वय 40) या महिलेविरुद्ध भादंवि 448, 420, 506 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांचे सहकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. लग्न करण्यामागचा उद्देश वेगळा असल्याची चर्चा सुरू आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला पाच मुले आहेत. यापैकी कोणालाही कल्पना न देता 20 एप्रिल 2024 रोजी उपनोंदणी कार्यालयात लग्नाची नोंद करण्यात आली आहे. त्या अधिकाऱ्याच्या पेन्शनवर व मालमत्तेवर डोळा ठेवून संबंधित महिलेने मदतीच्या नावाखाली निवृत्त अधिकाऱ्याशी लग्न केल्याचा आरोप केला जात आहे. 3 मे रोजी निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाला धमकावण्याचाही प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article