For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | मावशींनी भाचीला पकडलं अन् दुसरीने डोक्यात घातला घाव!

03:13 PM Aug 26, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   मावशींनी भाचीला पकडलं अन् दुसरीने डोक्यात घातला घाव
Advertisement

Sangli Crime : आष्टा येथील शेळके मळा, गांधीनगर भागात कौटुंबिक वादातून एका २३ वर्षीय तरुणीवर तिच्याच दोन मावशींनी हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पूनम शिवाजी जगताप (वय २३, रा. गांधीनगर, आष्टा, जि. सांगली) या तरुणीने आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूनम जगताप ही २३ रोजी दुपारी शेळके मळा येथील तिच्या आईच्या घरी गेली होती. त्यावेळी तिच्य मावशी विद्या भरत चांदणे (रा. गांधीनगर, आष्टा) व नकुशा
भरत जगताप (रा. डांगे कॉलेजजवळ, आष्टा) या दोघी तेथे आल्या. तू आमच्याबद्दल तुझ्या आईला काय सांगतेस? असा जाब विचारून त्यांनी पूनमला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वाद वाढल्यानंतर बिद्या चांदणे हिने पूनमला घट्ट पकडून ठेवले, तर नकुशा जगताप हिने कोणत्या तरी हत्याराने पूनमच्या डोक्याच्या उजव्या बाजूला प्रहार करून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पूनम जगताप हिच्या तक्रारीवरून आष्टा पोलिसांनी संशयित आरोपी विद्या भरत चांदणे व नकुशा भरत जगताप या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.