400 कोटी लूटप्रकरणी ऑडिओ व्हायरल
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक-गोवा सीमेवर 400 कोटी रुपयांची रोकड असलेला कंटेनर लूटप्रकरणी व्यापारी किशोर आणि आरोपी जयेश यांचा बोलतानाचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये पैशांची वाहतूक आणि लुटीबाबत चर्चा करण्यात आली आहे. आरोपी विराट पैशांची वाहतूक करण्याची जबाबदारी घेत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये निष्पन्न झाले आहे. मुलांच्या टोळीमार्फत पैसे वाहतूक करण्यास विराटला सांगितले होते. आता विराटच्या टोळीतील मुलेही बेपत्ता आहेत. गुजरातमधील एका राजकारण्याचाही यात सहभाग असल्याचा संशय आहे.
एका आश्र्रमात त्यांनी पैशांची देवाणघेवाण करण्याबद्दल चर्चा केली आहे. अहमदाबादमधील एका आश्र्रमात याबद्दल चर्चा केली आहे. व्यापारी किशोरकडे पैसे असल्याबद्दलचे संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये दाखविण्यात आले असून तो ऑडिओ व्हायरल झाला आहे. व्यापारी किशोर आणि आरोपी जयेश यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये वाहतूक आणि लुटीबाबत चर्चा करत आरोपी विराटकडे याची जबाबदारी देण्यात आली होती.