ऑडी इंडियाने उभारली 6500 चार्जिंग केंद्रे
कंपनीने दिली माहिती : चार्जिंगची होणार सोय
नोएडा :
लक्झरी कार निर्माती कंपनी ऑडी इंडिया यांनी देशात आतापर्यंत 6500 इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग केंद्रे उभारली आहेत. कंपनीने या योगे महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळवलं आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरात देशभरात वाढ झाली असून ती पाहता देशात जास्तीत जास्त चार्जिंग केंद्रांची गरज यापुढेही असणार आहे.
जर्मनीमधील या कंपनीने ‘चार्ज माय ऑडी’ नावाने देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात चार्जिंग केंद्रे उभी केली आहेत. या चार्जिंग केंद्रांच्या उभारणी करिता कंपनीने 16 नव्या भागीदारांचा शोध घेतलेला आहे.
75 केंद्रात जलद चार्जिंग सेवा
जवळपास 75 केंद्रांवरती जलद चार्ज होणारे तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे, अशीही माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे वाहनधारकांना आपले वाहन लवकरात लवकर चार्ज करून पुढील प्रवास करणे शक्य होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये विस्तारात कंपनीने जवळपास 5500 चार्जिंग केंद्रे उभारली असल्याचेही सांगण्यात येत आहे.