Shahuwadi theft news | शाहूवाडीत मध्यरात्री तीन दुकानांत धाडसी चोरी
दौलत हार्डवेअरमध्ये पुन्हा चोरी
शाहूवाडी - मलकापूर येळाने मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या तीन दुकानात ,मागील बाजूने शिरकव करून अज्ञात चोरट्याने मोबाईल, सीसीटीव्ही, वाय-फाय व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली या चोरीची नोंद शाहुवाडी पोलीसात झाली आहे. अंदाजे 20 ते 25 हजार रुपयाची चोरी झाल्याची प्राथमिक चर्चा सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार येळाने मलकापूर मार्गावर तानाजी दौलु कारंडे यांचे दौलत हार्डवेअर, ऋषिकेश बाबुराव कारंडे यांचे दौलत पेंट्स व विकास भोसले यांचे स्वामी समर्थ नेट कॅफे अशी दकाने आहेत. या दुकानातील शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागील बाजूने असलेला पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला .दौलत हार्डवेअर मधील सीसीटीव्ही व ड्रावर मधील सुट्टे पैसे, दौलत पेंट्स मधील तीन हजार रुपये व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल , स्वामी समर्थ नेट कॅफे येथील वाय-फाय व कॅश ड्रावर मधील रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपस केला आहे.
पुन्हा त्याच दुकानात चोरी
याच दौलत हार्डवेअर मध्ये मागील काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती त्या चोरीचा तपास अद्याप लागला नव्हता तोपर्यंत त्याच दुकानासह परिसरात दुसरी चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान दुकानापासून काही अंतरावर राऊटर सापडल्याचे दिसून आलं तर चोरट्याने पत्रा उचकटल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दगडाचा आधार देऊन पत्रा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी शाहूवाडी पोलिसांनी भेट देऊन अधिक माहिती घेतली.