For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आकर्षक फुलांची आवक

10:26 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आकर्षक फुलांची आवक
Advertisement

अशोकनगर फूल बाजारात उलाढाल : झेंडू, शेवंतीला पसंती

Advertisement

बेळगाव : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अशोकनगर येथील होलसेल फूल बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. शिवाय नवीन वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे बाजारात फुलांची मागणीही वाढली होती. फूल बाजारात विविध आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यातील विविध भागातून फुले विक्रीसाठी दाखल झाली होती. मात्र, उत्पादन कमी असल्याने फुलांचा दर आवाक्याबाहेर होता. शेवंती 300 ते 350 रुपये किलो, झेंडू 100 ते 120 रुपये किलो, ऑस्टल 200 रुपये किलो तर गुलाब 250 रुपये किलो असा दर होता. यंदा पावसाअभावी सर्वच पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे फूल बागायतीवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे फूल उत्पादन कमी झाल्याने दर वाढले आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घरे, दुकाने आणि वाहने यांची पूजा केली जाते. त्यामुळे फुलांची मागणी अधिक असते. सोमवारी होलसेल फूल बाजारात उलाढाल वाढली होती. गुलाब, शेवंती, झेंडू आदी फुलांना मागणी होती. त्याबरोबरच नवीन दुकाने आणि इतर नवीन कामांनाही पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ केला जातो. त्यामुळे हार, फुले यांना मागणी अधिक असते. त्याचबरोबर हार, तोरण आणि इतर सजावटीसाठी झेंडूंच्या फुलांचा वापर केला जातो.

किरकोळ बाजारातही आवक

Advertisement

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी किरकोळ बाजारातही फुलांची आवक वाढली होती. गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी फुलांची विक्री झाली. पाडव्याला विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यासाठी फळा-फुलांबरोबर पूजेच्या साहित्याची मागणी वाढली होती.

कमी आवकेमुळे दरात वाढ

यंदा फुलांची आवक कमी असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. झेंडू व शेवंतीच्या फुलांना अधिक मागणी आहे. सोमवारी बाजारात 10 टन हून अधिक फुलांची विक्री झाली. उन्हाळ्यात फुलांचे उत्पादन कमी होते. त्यामुळे भाव अधिक असतो.

-महांतेश मुरगोड, सहसंचालक, बागायत खाते

Advertisement
Tags :

.