महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत मागणीसाठी पत्रकारांचे लक्षवेधी आंदोलन

05:52 PM Dec 27, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

नागरिक,सरपंच,सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा पाठींबा

Advertisement

२६ जानेवारी पर्यत नगरपंचायत स्थापनेची घोषणा करा ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

Advertisement

सिंधुदुर्गनगरी-

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची निर्मिती तातडीने करावी या मागणीसाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघामार्फत संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पत्रकार, नागरिक,व्यापारी,उद्योजक, सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सिंधुदुर्ग जिल्हाचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे होऊन तीस वर्षे उलटली मात्र येथे नगरपंचायत अद्याप पर्यत स्थापन झालेली नाही. येथे प्राधिकरण आहे मात्र प्राधिकारणला विकास निधी नाही त्यामुळे सिंधुदुर्गनगरिचा विकास होऊ शकलेला नाही सिंधुदुर्गनगरीचा विकास होण्यासाठी सातत्याने नागरिक मागणी करत आहेत. मात्र अद्याप पर्यत त्याची गंभीर दखल घेतली गेली नसल्याने अखेर सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने पुढाकर घेत सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले
या आंदोलनात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर , जेष्ठ पत्रकार शेखर सामंत, संतोष वायगणकर, गणेश जेठे, बाळ खडपकर ,जिल्हा मुख्यालयातील सर्व पत्रकार तसेंच सिंधुदुर्गनगरी मधील नागरिक ,व्यापारी, उद्योजक,सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्वानी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले व २६ जानेवारी पर्यत नगरपंचायत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा दिला. दरम्यान, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंगरे यांनी सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :
# Attention Movement of Journalists# sindhudurgnagari # tarun bharat news#
Next Article