For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Water Supply |कोल्हापूरकरांनो सावधान! आजपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

11:36 AM Jun 22, 2026 IST | NEETA POTDAR
water supply  कोल्हापूरकरांनो सावधान  आजपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा
Advertisement

कोल्हापूर : अल् निनोच्या प्रभावामुळेमान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. धरणातून थेट पाईपलाईनद्वारे होणारा पाणी उपसा कमी झाला आहे. परिणामी काळम्मावाडी योजनेतून शहराला नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य बनले आहे. महानगरपालिकेने शहर व उपनगरांमध्ये सोमवारी, २२ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी केली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

Advertisement

महापालिकेकडून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पर्यायी पाणी उपसा सुरू केला आहे. या केंद्रांच्या क्षमतेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. चंबुखडी, पुईखडी व कसबा बावडा येथील फिल्टर हाऊसवरून वितरित होणाऱ्या विविध भागांमध्ये सोमवारी २२ आणि मंगळवार, २३ जूनपासून एक दिवसाआड त्या त्या भागात नियोजनानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.