For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News| कराडकरांनो लक्ष द्या! ईद-ए-मिलादनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल

03:21 PM Aug 26, 2026 IST | NEETA POTDAR
karad news  कराडकरांनो लक्ष द्या  ईद ए मिलादनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल
Advertisement

कराड :ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी बुधबार २६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात वाहतुकीत बदल केले आहेत. दरम्यान, मुख्य मिरवणूक रस्त्यावर असणारे स्टॉल, हातगाडे हटवण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या.

Advertisement

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत शहरासह तालुक्यातील सुमारे ८ ते ९ हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता, बाहतूक कोंडी टाळणे आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे.

पोलिसांच्या अधिसूचनेनुसार पीर हजरत दर्गा, चावडी चौक, नेहरू चौक, आझाद चौक, दत्त चौक, विजय दिवस चौक, जनता बँक, टाऊन हॉल, प्रभात टॉकीज, पालकर बाडा, ज्योतिबा मंदिर, कन्या शाळा, कमानी मारुती मंदिर, पीर हजरत दर्गा या मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या बाहनांना प्रवेश व पार्किंग बंद राहणार आहे. तसेच दत्त चौक, यशवंत हायस्कूल, आझाद चौक, चावडी चौक, प्रीतीसंगम घाट या मार्गावरही वाहनांना प्रवेश व पार्किंग बंदी राहणार आहे. कोल्हापूर नाका, पाटण तिकाटणे, दैत्य निवारणीकडून शाहू चौकाकडे जाणारी वाहतूक अजंठा चौक, पोपटभाई पेट्रोल पंप, भेदा चौक, एसटी स्टँड, टी-पॉईंट, विजय दिवस चौक या मार्गाने वळविण्यात आली आहे.

Advertisement

सैदापूर कॅनॉल, बिजय दिवस चौक, एसटी स्टँड, दत्त चौक, कोल्हापूर नाका या मार्गावरील वाहतूक विजय दिवस चौक, एसटी स्टँड, टी-पॉईंट, भेदा चौक, पोपटभाई पेट्रोल पंपमार्गे कोल्हापूर नाक्याकडे वळविण्यात आली आहे. तर कृष्णा सर्कल, पांढरीचा मारुती, ज्योतिबा मंदिर, कमानी मारुती मंदिरमार्गे प्रीतीसंगम घाटाकडे जाणारी बाहतूक कमानी मारुती मंदिर, सातशहीद चौक, जनकल्याण बँक, प्रीतीसंगम घाट या मार्गाने वळविण्यात आली आहे. या वाहतूक बदलातून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे. अडथळे हटवण्याच्या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घाडगे, सचिन साळुंखे, वैभव यादव, प्रवीण कोळी, राहुल माळी, हवालदार कपिल टीकोळे, मधुकरकर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.