अमर होण्याच्या औषधाच्या निर्मितीचे प्रयत्न
अब्जाधीशांच्या समुहाकडून पुढाकार
पैशासोबत माणसाच्या इच्छाही वाढत जातात, माणूस शतकांपासून अमरत्वाचे स्वप्न पाहत आहे आणि आता हे स्वप्न वास्तवात बदलण्याच्या समीप आहे. जगातील सर्वात धनाढ्या लोक अशा तंत्रज्ञान आणि औषधांकरता पाण्यासारखा प्रैसा करत आहेत, जे मानवी आयुष्याला हव्या तितक्या काळापर्यंत वाढविण्याची शक्ती बाळगून असेल.
आयुष्य वाढविणाऱ्या तंत्रज्ञानावर अब्जाधीश गुंतवणूक करत आहेत. अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी स्वत:ची कंपनी एटलॉस लॅब्समध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बायोटेक कंपनी आहे. याचा उद्देश बायोलॉजिकल रीप्रोग्रामिंग तंत्रज्ञानावर काम करणे असून जे मानवी पेशींना प्रयोगशाळेत पुन्हा युवा स्वरुप देऊ शकते.
पे-पलचे सह-संस्थापक पीटर थील यांनी मेथ्युसेलाह फौंडेशनमध्ये गुंतवणूक केली आहे. हे फौंडेशन नव्या तंत्रज्ञानांद्वारे आजारांना रोखणे आणि आयुष्य वाढविण्यावर काम करत आाहे. चॅटजीपीटीचे संस्थापक सॅम आल्टमॅन यांनी रेट्रो बायोसायन्समध्ये 180 दशलक्ष डॉलर्स गुंतविले आहेत. हे तंत्रज्ञान मानवी आयुष्य 10 वर्षांपर्यंत वाढवू शकते असा दावा केला जातो.
मृत्यूवर मात करणे शक्य आहे का?
या तंत्रज्ञानांमध्ये बायोलॉजिकल रीप्रोग्रामिंग, पेशींना पुनरुज्जीवित करणे आणि त्यांना तरुण राखण्यावर संशोधन केले जात आहे. अलिकडेच लंडनमध्ये इम्पीरियल कॉलेज आणि सिंगापूरच्या ड्यूक-एनयुएस मेडिकल स्कुलने एक औषध विकसित केले आहे, ज्याने प्रयोगशाळेत उंदरांचे आयुष्य 25 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे.
पॉश जॉम्बीचे जग?
परंतु या स्वप्नांसोबत वाद देखील जोडला गेला आहे. स्मार्टवॉटर ग्रूपचे संस्थापक फिल क्लेरी यांनी यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे तंत्रज्ञान केवळ धनाढ्यांपुरती मर्यादित राहणार आहे आणि एक असा समाज तयार होईल, जेथे केवळ पॉश, प्रिविलिज्ड जॉम्बी दीर्घायुष्याचा आनंद घेतील. अब्जाधींशांना आयुष्य वाढविण्याचे प्रयत्न सोडून देत गरीब मुलांना वाचविण्यासाठी स्वत:ची संपत्ती वापरण्याची गरज आहे. दरवर्षी 50 लाख मुले उपासमारी आणि उपचाराअभावी मृत्युमुखी पडत असल्याचे क्लेरी यांनी म्हटले आहे.
अमरत्व अन् मानवी समाज
आयुष्य वाढविण्याच्या औषधांमुळे जगात असमानता वाढेल, काही दशकांपर्यंत लोकांना जिवंत ठेवू शकेल असे औषध जगाला आणखी अन्यायपूर्ण आणि विषम स्वरुप देईल. हे औषध केवळ धनाढ्यांकडे असेल, तर गरीब स्वत:च्या मूलभूत गरजांसाठी देखील संघर्ष करतील. आयुष्याचा खरा अर्थ मुलांना त्यांच्या 18 व्या जन्मदिनापर्यंत जगविणे असून धनाढ्यांसाठी दीर्घायुष्याचा मार्ग तयार करणे नव्हे असे क्लेरी यांनी सुनावले आहे.