कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : लॅब चालकावर गुन्हा

12:19 PM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंडलगा कारागृहात रवानगी, लॅबचा परवाना रद्द करण्याची नागरिकांची मागणी, तालुका वैद्याधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

खानापूर : खानापूर येथील वर्दे प्लॉट येथे असलेल्या सुविधा क्लिनिकल लॅबोरेटरी चालक सुलतान अबालाल मोमीन (वय 48) याने आपल्या लॅबमधील कर्मचारी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खानापूर पोलिसात नेंद झाला आहे. खानापूर पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला अटक केली. रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. याबाबत खानापूर शहरातील सर्वपक्षीयांतर्फे तालुका वैद्याधिकारी महेश किवडसन्नावर यांना निवेदन देवून सुलतान मोमीन याची लॅब सीझ करण्यात यावी, आणि त्याचा परवाना रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

Advertisement

लॅबवर कारवाई करण्याची मागणी

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वर्दे प्लॉट येथे गेल्या काही वर्षापासून सुविधा क्लिनिकल लॅबोरेटरी चालवण्यात येत होती. या लॅबोरेटरीचे चालक सुलतान मोमीन यांने बुधवारी आपल्या लॅबमधील कर्मचारी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा करून आपली सुटका करुन घेऊन पलायन केले. याबाबची माहिती आपल्या घरच्यांना दिली. तातडीने घरच्या लोकानी याबाबतची माहिती खानापूर पोलिसाना दिली. रात्री उशिरा सुलतान मोमीन याच्यावर कलम 75 (1) व 126 (2) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. या घटनेने खानापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. सुलतान याच्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यानी मोर्चा काढून निषेध करून तालुका वैद्याधिकाऱ्यांना निवेदन देवून त्याच्या लॅबवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी संजय कुबल म्हणाले, शहरात वैद्यकीय सेवा देण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे करणाऱ्या सुलतान याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, पंडित ओगले म्हणाले, शहरात सुलतान याने वैद्यकीय सुविधा देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. यापूर्वीही सुलतान याच्याबाबत तक्रारी होत्या. मात्र महिलांनी अब्रुसाठी वाच्यता केलेली नाही. समज देऊनही पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याने नातेवाईकांनी खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नेंद केला आहे. वैद्यकीय सेवेच्या नावाने महिलांचे शोषण करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करावी, आणि वैद्यकीय सेवेचा परवाना कायमस्वरुपी रद्द करावा.

कारवाई करण्याचे वैद्याधिकाऱ्यांचे आश्वासन

यावेळी प्रमोद कोचेरी, अॅड. चेतन मणेरीकर, राजू रायका, के. पी. पाटील, जॉर्डन गोन्साल्विस यांनी विचार मांडले. तालुका वैद्याधिकारी महेश किवडसन्नावर यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण तातडीने जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाई करू, असे आश्वासन दिले. यावेळी शहरातील युवा वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article