कराडजवळ बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न
कराड :
प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात येणाऱ्या बहेली सापळ्यात बिबट्या अडकल्याची घटना कराड तालुक्यातील कासारा†शरंबे गावात घडली. शिकारीच्या उद्देशाने सापळा लावून बिबट्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच ऊसतोड कामगारांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पट्टेरी वाघ, बिबट्या हे वन्यजीव पकडण्यासाठी वापरण्यात येणारा बहेरी सापळा व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकाराने कासारशिरंबेसह परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रकाश बापूराव पवार, सुनील ा†दलीप पवार, ा†वशाल ा†दलीप पवार, ा†मथुन भाऊराव शिंदे, भीमराव बाबुराव पवार, (सर्व रा. भालकी, ता. भालकी, ा†जल्हा ा†बदर, कर्नाटक सध्या रा. कासारा†शरंबे) अशी संशयितांची नावे आहेत. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील डोंगराळ भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. डोंगरालगत असलेल्या शेतात किंवा मानवीवस्तीत बिबट्या दिसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभाग सातत्याने अलर्ट राहात असतो. दरम्यान कराड तालुक्यातील कासारशिरंबे येथे शेतकरी माऊती संभाजी बोंद्रे यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड सुरू होती. त्यासाठी कर्नाटकातील ऊसतोड मजूर आले होते. ऊसतोड मजुरांनी प्राण्यांच्या शिकारीसाठी अत्यंत गोपनीय ठिकाणी बहेली सापळा लावला. या सापळ्यात एखादा प्राणी अडकतो का? याची ते वाट होते. वन्यप्राणी अडकला तर त्याची शिकार करण्याचा संशयितांचा उद्देश असावा. या बहेली सापळ्यात मंगळवारी बिबट्या अडकला. बिबट्या बहेली सापळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली. शेतमालक मारूती बोंद्रे हा प्रकार समजल्यावर त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली.
उपवनसंरक्षक श्रीमती आा†दती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक महेश झांजुर्णे, वनपरीक्षेत्र आ†धकारी कराड श्रीमती ला†लता पाटील, वनपाल बाबुराव कदम, रोहन भाटे मानद वन्यजीव रक्षक, वनरक्षक दशरथ ा†चट्टे, आ†भनंदन सावंत, का†वता रासवे, वनसेवक अतुल कळसे, सतीश पाटील यांच्यासह अधिकारी कासारशिरंबे येथे दाखल झाले. बिबट्याला बहेली सापळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बिबट्या सापळ्यातून बाहेर येताच त्याने झाडाझुडपात धूम ठोकली. यानंतर वनविभागाने बहेली सापळा नेमका कोणी लावला? याची चौकशी सुरू केली. या चौकशीत ऊसतोड कामगारांनी शिकारीच्या उद्देशाने बहेली सापळा लावल्याचे स्पष्ट झाल्यावर वनविभागाने संशयितांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. संशयितांकडून दोन बहेली सापळ्यासह तारेचा पिंजरा, टोकदार लोखंडी सळी, लाकडी मूठ असलेली, तीन वाघर, एक नायलॉन रस्सी, क्लच वायरचा फास सा†हत्य हस्तगत केले. आ†धक तपास वनक्षेत्रपाल ला†लता पाटील करीत आहेत.
बहेली सापळा चौथ्यांदा हस्तगत
कराड तालुक्यात वन्यजीवांची शिकार करणाऱ्या अनेकांना गजाआड व्हावे लागले आहे. कासारशिरंबे येथील घटनेत चक्क बिबट्याच बहेली सापळ्यात अडकल्याने चर्चेला उधाण आले आहे. पट्टेरी वाघ, बिबटे यांच्या शिकारीसाठी बहेली सापळ्यांचा वापर होत असतो. बहेली सापळे कराड परिसरातही सापडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी कराड परिसरात खोडशी, सुपने व तांबवे येथे बहेली सापळे वनविभागाला मिळाले होते. आता कासारशिरंबेत सापळा हस्तगत केला आहे.