महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा पोलीसप्रमुखांच्या नावे बनावट अकाऊंटद्वारे फसवणुकीचा प्रयत्न

11:23 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या नावे फेसबुकवर बोगस अकाऊंट काढून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. यासंबंधी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून अशा फसवणुकीच्या प्रकारांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुखांनी केले आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या फोटोचा वापर करून फेसबुकवर बनावट अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुगळखोड, ता. रायबाग येथील संतोष अरभावी यांच्या फेसबुक अकाऊंटवर एसपींच्या नावे संदेश पाठविण्यात आले. त्यांच्या मोबाईल क्रमांकवर थोड्या वेळात माझ्या मित्राचा नंबर देतो, त्यांच्याशी बोला, असे सांगण्यात आले. आपण सीआरपीएफचा जवान संतोषकुमार असल्याचे सांगत संभाषणाला सुरुवात करणाऱ्या भामट्याने आपली बदली झाली आहे. गृहोपयोगी वस्तू कमी किमतीत विकायच्या आहेत. केवळ 1 लाख 20 हजार रुपये दिले तर घरातील सर्व वस्तू पोहोचवू, असे सांगण्यात आले. एसपींच्या नावे खोटे अकाऊंट उघडून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article