For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला घातपाताचा प्रयत्न

06:31 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला घातपाताचा प्रयत्न
Advertisement

रेल्वेमार्गावर दुचाकी ठेवून तरुण फरार : इंजिनमध्ये अडकल्याने चेंदामेंदा

Advertisement

वृत्तसंस्था/ प्रयागराज

उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये एका तरूणाने आपली दुचाकी टाकून रूळावर येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोरून पळ काढला. दुचाकी वंदे भारत टेनच्या इंजिनमध्ये अडकून लांबपर्यंत ओढत राहिली. चालकाने प्रसंगावधान राखत एक्स्प्रेसची गती कमी केल्यामुळे सुदैवाने वंदे भारत ऊळावरच राहिली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

Advertisement

वंदे भारत वाराणसीहून प्रयागराज जंक्शनकडे निघाली असताना हा अपघात झाला. झाशी स्थानकाजवळील बांधवा ताहिरपूर रेल्वे अंडरपासवर काही तऊण दुचाकीसह रेल्वे रूळ ओलांडत होते. दरम्यान, समोरून वंदे भारत येत असल्याचे दिसल्याने एका तऊणाने दुचाकी रेल्वेऊळावर टाकून पळ काढला. दुचाकीची जोरदार धडक बसल्यामुळे जोरदार आवाज झाला. दुचाकी ओढल्याचा जोरात आवाज येऊ लागल्याने लोको पायलटने आपत्कालीन ब्र्रेक लावून टेन थांबवली. वाराणसी येथील ईशान्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आल्यावर अलर्ट जारी करण्यात आला आणि रेल्वे ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. आरपीएफ आणि जीआरपी या घटनेचा तपास करत असून दुचाकी मालकाचा शोध घेतला जात आहे. दुचाकी मालकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी दगडफेकीच्या घटना

यापूर्वी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत टेनवर दगडफेक झाली होती. ही घटना कानपूरच्या पंकी स्टेशनजवळ घडली. या घटनेमुळे रेल्वेच्या काचा फुटल्या. दगडफेकीच्या या घटनेनंतर डब्यातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेची माहिती वंदे भारत टेनच्या चालकाने नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर आरपीएफ पंकी यांनी अज्ञात दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

Advertisement
Tags :

.