For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेलग्रेडमध्ये इस्रायली दूतावासावर हल्ल्याचा प्रयत्न

06:25 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेलग्रेडमध्ये इस्रायली दूतावासावर हल्ल्याचा प्रयत्न
Advertisement

सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात हल्लेखोर ठार

Advertisement

वृत्तसंस्था, बेलग्रेड

सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे इस्रायलच्या दूतावासाबाहेर एका सुरक्षा रक्षकावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना झाली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला. सर्बियाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेकडे संभाव्य दहशतवादी हल्ला म्हणून पाहत तपास सुरू केला आहे. घटनेनंतर इस्रायली दूतावास आणि इतर संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दूतावासाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचा प्रतिकार करत सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला. त्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला, तर सुरक्षा रक्षकाला किरकोळ दुखापत झाली. सर्बियाचे गृहमंत्री इविका डाचिच यांनी या घटनेला संभाव्य दहशतवादी हल्ला मानून तपास सुरू असल्याचे सांगितले. मात्र, हल्लेखोराची ओळख आणि त्याच्या वयाबाबत अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.

Advertisement

इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचा संशय

सर्बियाच्या गृहमंत्र्यांच्या दाव्यानुसार, संशयित व्यक्तीचा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला पाठिंबा असल्याचा संशय आहे. त्याच्या सोशल मीडिया खात्यावर या संघटनेशी संबंधित सामग्री आढळली आहे. या दाव्यांची तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे. हल्ल्यादरम्यान संशयिताने धार्मिक घोषणा दिल्याचेही समजते.

2024 मधील हल्ल्याचीही आठवण

बेलग्रेडमधील इस्रायली दूतावासावर यापूर्वी जून 2024 मध्येही हल्ला झाला होता. त्या वेळी धनुष्यबाणासारख्या क्रॉसबो शस्त्राने एका सर्बियन पोलिस अधिकाऱ्याला जखमी करण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने हल्लेखोरावर गोळीबार केला होता. त्या घटनेनंतरही दूतावासाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.