Kolhapur News : कोल्हापूर तहसील कार्यालयातील तलाठी खोली पेटवण्याचा प्रयत्न!
जुन्या करवीर तहसीलमधील प्रकार ;आग जाणीवपूर्वक लावल्याचा संशय
कोल्हापूर : जुन्या तहसील कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या कसबा करवीर चावडीत रविवारी चोरीच्या उद्देशाने आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये महत्वपूर्ण कागदपत्रांचे दोन गट्टे, टेबल, खुर्ची जळून खाक झाली. अज्ञातांनी खिडकीची जाळी फाडून आतील काही कागदपत्रे काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या आगीमध्ये करवीर तलाठी केबीनही पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्राम महसूल अधिकारी किरण भिमराव आंबुलकर (वय ४८, रा. कसबा गेट, महाद्वार रोड, मूळ रा. बटकणंगले, गडहिंग्लज) यांनी याबाबतची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, जुन्या करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस असलेले करवीर चावडी कार्यालय शुक्रवारी दुपारी बंद करून कर्मचारी गेले होते. शनिवार व रविवारी सुट्टीनंतर सोमवारी सकाळी अस्लम शेख कार्यालय उघडण्यास आले. यावेळी केबीनमधून काही तरी जळालेला उग्र वास आला. तलाठी केबीन व त्यामागील खोलीत जाऊन पाहिले असता लोखंडी कपाटाच्या बरच्या कप्यातील कागदपत्रांचे गड्ढे जळून खाक झाल्याचे दिसले.
तसेच एका गट्ट्याची वरील काही कागदपत्रे जळाली होती. याचसोबत पडदाही जळला होता. शेख यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तसेच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. २४ तासापूर्वी ही आग कोणीतरी लावत्याचा अंदाज व्यक्त केला. दरम्यान या घटनेमुळे करवीर चावडीतील कामकाज ठप्प राहिले.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
शनिवार व रविवारी कार्यालय बंद होते. सोमवारी कार्यालयात कागद, टेबलाची केवळ राख होती. आग पूर्णपणे बुजली होती. शनिवारी मध्यरात्रीच आग लावल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळाहून नमुने घेतले आहेत. करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, प्रभारी तहसीलदार स्वप्निल पवार, पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह करवीर चावडीचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
खिडकीची जाळी तोडून चोरी
कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या खिडकीची जाळी तोडण्यात आली आहे. दुचाकीच्या स्टॅन्डची प्रिंग वापरून तयार केलेल्या आकड्याने कपाटातील काही कागदपत्रे बाहेर ओढण्यात आली. खिडकीच्या बाहेर काही कागदपत्रांचे गड्ढे पडले होते. हे गड्ढे कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी कार्यालयात परत आणून ठेवले.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी शनिवार व रविवारी कार्यालय बंद होते. सोमवारी कार्यालयात कागद, टेबलाची केवळ राख होती. आग पूर्णपणे बुजली होती. शनिवारी मध्यरात्रीच आग लावल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळाहून नमुने घेतले आहेत. करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, प्रभारी तहसीलदार स्वप्निल पवार, पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह करवीर चावडीचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
काच फोडून आग लावल्याची शक्यता
तलाठी यांच्या केबीनच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तसेच दुसऱ्या खोतीतील खिडकीची जाळी कापण्यात आली आहे. यानंतर आग लावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा तपस करण्यात येईल आहे. - श्रीराम कन्हेरकर, पोलीस निरीक्षक, लक्ष्मीपुरी