For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोरटकरला यंत्रणेकडून वाचविण्याचा प्रयत्न

12:00 PM Mar 23, 2025 IST | Radhika Patil
कोरटकरला यंत्रणेकडून वाचविण्याचा प्रयत्न
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

एक महिन्याचा कलावधी लोटत आला. तरीसुध्दा प्रशांत कोरटकरसारखा चिल्लर माणूस अद्यापी पसार आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे. त्याला कुठली तरी यंत्रणा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे त्याला अजूनही अटक होत नाही. असा गंभीर आरोप करून त्याचा पासपोर्ट रद्द करा, अशी मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

निवेदनात म्हटले, कोरटकर हा इंदोर, चंद्रपूर, कोलकता आदी ठिकाणी लपून बसल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता तो थेट दुबईला पळून गेल्याचे समोर आले आहे. कोरटकर याचा पासपोर्ट पोलीस ठाण्यात आणून दाखविणे आणि पासपोर्ट जमा करण्याबाबत त्याच्या पत्नीला उपस्थित राहण्याबाबत समन्स काढून, पोलिसांनी तिची तपासात मदत घ्यावी. त्याला पळून जाण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांची चौकशी करावी, अशीही मागणी सावंत यांनी केली. या निवेदनावर इंद्रजित सावंत, त्यांचे वकील अॅड. हेमा काटकर, अॅड. योगेश सावंत यांच्या सह्या आहेत.

Advertisement

  • ते फोटो 2023 च्या दुबई वारीचे

कोरटकर नोव्हेंबर 2023 मध्ये दुबईला गेला होता. त्यावेळी त्याने त्याच्या सोशल मीडिया दुबई वारीचे आपले फोटोही टाकले होते. त्यापैकी काही फोटो शनिवारी समाज माध्यमावर व्हायरल झाले. तो दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर तपासात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कोरटकरचे दुबईचे जुने फोटो व्हायरल केल्याची सुध्दा चर्चा आहे.

  • चंद्रपुरातील त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाची चौकशी

कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाचे पथक रवाना झाले. या पथकाला कोरटकर चंद्रपुरातील पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये आश्रयाला थांबल्याची माहिती मिळाली. त्यावऊन हे पथक चंद्रपुराला गेले. पण तो तेथून निघून गेल्याने, पोलिसांनी त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे त्याच्याविषयी चौकशी कऊन, पुन्हा नागपूरकडे परत आले.. नागपूरमध्ये पोलिसांच्या दोन पथकाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

Advertisement
Tags :

.