खुनाचा प्रयत्न ; ट्रकचालकास 10 वर्षे सक्तमजुरी
रत्नागिरी :
तालुक्यातील जयगड येथे ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर तलवारीने वार केल्याप्रकरणी ट्रकचालकाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावल़ी योगेश अनंत सावंत (35, ऱा सैतवडे-बलभीमवाडी) असे आरोपीचे नाव आह़े त्याच्याविरुद्ध जयगड पोलिसांकडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व भारतीय हत्यार कायद्यानुसार आरोपपत्र ठेवण्यात आले होत़े
रत्नागिरी सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षाकडून अॅड़ अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिल़े योगेश सावंत हा जयगड येथील साहस ट्रान्स्पोर्ट कंपनीत मालवाहू ट्रक (एमएच 08 एएच 2975) वर चालक म्हणून कामाला होत़ा तर याच कंपनीत संदेश सुरेश पवार (35, ऱा वाटद खंडाळा) हा सुपरवायझर म्हणून काम पाहत होत़ा 8 नोव्हेंबर 2020 रोजी संदेश याने मालवाहतूक ट्रकचे चलन ऑफिसमध्ये जमा कर, असे योगेश याला सांगितले होत़े यावरून योगेशने सायंकाळी चलन जमा करतो, असे संदेश याला सांगितल़े योगेश हा चलन घेऊन येणार म्हणून संदेश हा वाट पाहत उभा होत़ा रात्री 10 वाजण्याच्या सुमारास योगेश हा दुचाकीवरून त्याठिकाणी आल़ा यावेळी योगेश व संदेश यांच्यात चलन जमा करण्यावरून जोरदार बाचाबाची झाल़ी त्यावेळी योगेश हा त्या ठिकाणाहून निघून गेला होत़ा यानंतर रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास योगेश हा संदेश उभा असलेल्या ठिकाणी आल़ा यावेळी योगेशने टी-शर्टमध्ये लपवून ठेवलेली तलवार काढून संदेश याच्या डोक्यात मारल़ी हा वार संदेशने चुकविण्याचा प्रयत्न केला, मात्र तलवारीचे टोक त्याच्या कपाळावर लागल़े योगेश हा तलवारीने वार करत असल्याचे पाहून संदेश याच्यासोबत असलेल्या दोघांनी त्याला अडविल़े दरम्यान, तलवारीच्या वारामुळे जखमी झालेल्या संदेश याला उपचारासाठी जिल्हा शासकीय ऊग्णालय येथे दाखल करण्यात आले होत़े
योगेश याने केलेल्या हल्ल्याप्रकरणी संदेश याने जयगड पोलिसात तक्रार दाखल केल़ी पोलिसांनी योगेश याच्याविरुद्ध भादंवि कलम 307 नुसार खूनाचा प्रयत्न व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केल़ा जयगड पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रायसिंग पाटील यांनी गुह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आल़े न्यायालयापुढे पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल वंदना लाड यांनी काम पाहिल़े