कल्लेहोळ येथील जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न
राक्षे बंधूंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
बेळगाव : कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील जमिनीमध्ये अतिक्रमणाचा प्रयत्न होत असून याची चौकशी करून न्याय मिळून द्यावा, अशी मागणी कलमेश्वर गल्ली कल्लेहोळ येथील उत्तम कृष्णा राक्षे व बंधूंनी केली आहे. राक्षे कुटुंबीयांनी मंगळवार दि. 15 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. शिरस्तेदार एस. एम. परगी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. निवेदनात राक्षे कुटुंबीयांनी म्हटले आहे की, कल्लेहोळ येथील सर्व्हे नं. 123 (2 एकर 20 गुंठे जागा) व सर्व्हे नं. 124 (1 एकर 30 गुंठे जागा) ही आमच्या मालकीची आहे. महसूल दप्तरी तशी नोंदही आहे. या जमिनी अमित प्रभाकर कोरे व संतोष शंकरेप्पा मुनवळ्ळी यांनी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जमिनीतील सुमारे 300 काजूची झाडे तोडून ती जाळली आहेत. अमित कोरे व संतोष मुनवळ्ळी यांची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावी, असे म्हटले आहे.