कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोखंड व्यापाऱ्याला ठकवण्याचा प्रयत्न

12:21 PM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सतर्कतेमुळे फसवणुकीचा मोठा धोका टळला : तीन टन लोखंड घशात घालण्याचा प्रयत्न, लोखंड विक्रेत्यांमध्ये खळबळ

Advertisement

बेळगाव : जुन्या पी. बी. रोडवरील एका लोखंड व्यापाऱ्याला ठकवण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘तीन टन लोखंड पाठवा, माल पोहोचल्यावर पैसे देतो’ असे सांगत पैसे बुडविण्याचा प्रयत्न झाला आहे. व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. व्यापाऱ्यांना लुटणारी टोळीच कार्यरत असल्याचे सामोरे आले आहे. जुन्या पी. बी. रोडवरील एका लोखंड व्यापाऱ्याला फोन आला, ‘हिरेबागेवाडीला तीन टन लोखंड पाठवा, साईटवर माल पोहोचल्यावर त्याला पैसे देऊ’ असे फोन करणाऱ्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून व्यापाऱ्याने तीन टन माल गुड्स वाहनात भरून तो हिरेबागेवाडीला पाठवला. वाहन गावाजवळ पोहोचताच एक भलत्याच युवकाने त्यांना गाठले.

Advertisement

‘साईट कोठे आहे? हे दाखवतो. त्यानंतर लोखंड उतरवा’ असे सांगत त्याने एका नव्या बांधकामावर गुड्स वाहन घेऊन गेले. लोखंडही उतरविण्यात आले. तोपर्यंत ज्याच्या मोबाईलवरून संपर्क साधून लोखंड पाठवण्यास सांगितले होते, तो सारखे ‘थोडा वेळ थांबा, पैसे देतो’ असे सांगत राहिला. शेवटी तासाभराच्या प्रतीक्षेनंतरही पैसे मिळाले नाहीत. उलट त्याने आपला मोबाईल बंद केला. कामगारांनी ही गोष्ट लोखंड दुकान मालकाला कळवली. प्रकरण हिरेबागेवाडी पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलीसही त्यांचीच बाजू घेत होते. ज्यांनी लोखंड पाठवले, त्यांना ‘पैसे पोहोचल्याशिवाय तू माल कसा पाठवलास?’ अशी विचारणा केली. शेवटी कामगार टेम्पो घेऊन माल परत आणण्यासाठी साईटवर पोहोचले. त्यावेळी ‘तुमचा माणूस येऊन पैसे घेऊन गेला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला लोखंड परत देणार नाही’ असे दरडावून सांगण्यात आले.

आम्ही पैसे दिलेत, असेच ते सांगत राहिले. पोलीसही त्यांचीच बाजू घेत होते. त्यामुळे लोखंड दुकान मालकाने शेवटी हे प्रकरण पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्याकडे घेऊन जाण्याचे ठरविले. ‘मला एक तर पैसे द्या. नाहीतर माल परत करा’ असा पवित्रा घेतला. वाहन परत नेले नाही तर जेसीबीने तो फोडून टाकू, असे धमकावण्यात आले. दुकान मालकाने पोलीस आयुक्तांकडे जाऊन तक्रार करतो, असे सांगताच पोलीस व भामटे सगळेच नरमले. शेवटी गुड्स वाहनातून उतरविलेला माल कामगार व मालकांनी परत आणला. या घटनेने लोखंड विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article