For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एपीएमसी पोलिसांकडून अट्टल मोटारसायकल चोराला अटक

10:43 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
एपीएमसी पोलिसांकडून अट्टल मोटारसायकल चोराला अटक
Advertisement

चोरीच्या चार मोटारसायकली जप्त

Advertisement

बेळगाव : एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे. संजीव मल्लाप्पा मेकली (वय 24) रा. बेनकनहोळी, ता. हुक्केरी असे त्याचे नाव आहे. त्याने केएलई इस्पितळ रोड व सदाशिवनगर परिसरात चोरलेली तीन हिरोहोंडा स्प्लेंडर व एक डिओ अशा 1 लाख 35 हजार रुपये किमतीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन, पोलीस उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. संजीवला यापूर्वी खडेबाजार, माळमारुती, यमकनमर्डी पोलिसांनी मोटारसायकली चोरी प्रकरणी अटक केली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.