कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादावर प्रहार सुरूच

06:22 AM May 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काश्मीरमध्ये 11 ठिकाणी ‘एसआयए’चे छापे : सांबा परिसरातही लष्कराकडून शोधमोहीम

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध आणखी एक निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. राज्य तपास संस्थेने (एसआयए) काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी छापे टाकून दहशतवादाशी संबंधित नेटवर्कवर मोठी कारवाई केली. तसेच सोपोर, बारामुल्ला, हंदवाडा, गंदरबल आणि श्रीनगर सारख्या संवेदनशील भागातही शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन हस्तकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर टार्गेट किंलिंग आणि ग्रेनेड हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. अटक केलेले हस्तक एका फरार कमांडरसाठी काम करत असल्याने ते बराच काळ सुरक्षा एजन्सींच्या रडारवर होते, अशी माहिती सुरक्षा विभागाकडून देण्यात आली.

जम्मू काश्मीरमधील राज्य तपास संस्थेच्या (एसआयए) अधिकाऱ्यांनी मध्य आणि उत्तर काश्मीरमधील सोपोर, बारामुल्ला, हंदवाडा, गंदरबल आणि श्रीनगरसह अनेक भागात शनिवारी सकाळपासून छापे टाकण्यास सुरुवात केली. दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा एजन्सीला संशयित दहशतवादी हालचालींबद्दल माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. त्याच वेळी, सांबा जिह्यातील एका गावात दहशतवादी कारवाया दिसून आल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे. येथे लष्कर आणि इतर एजन्सींच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घालत शोधमोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

या छाप्यासह, बडगाम आणि श्रीनगरमधील सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावला. येथून, लष्कर-ए-तोयबाच्या तीन ओव्हरग्राउंड हस्तकांना जेरबंद करण्यात आले. हे हस्तक गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात कमांडर आबिद काइम लोनसाठी काम करत होते. हे लोक टार्गेट किलिंगची योजना आखत होते. तसेच परिसरात ग्रेनेड हल्ल्याचा कटही रचत होते.

दहशतवादाविरुद्ध कडक पहारा

या संपूर्ण कारवाईवरून सुरक्षा यंत्रणा काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाविरुद्ध अत्यंत सतर्क असून कोणत्याही प्रकारचे कट यशस्वी होऊ नये म्हणून सतत सक्रिय असल्याचे दिसून येत आहेत. दहशतवाद्यांकडून नजिकच्या काळात  आणखी मोठ्या कारवाया होण्याची भीती असल्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article