For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदू मंदिरांवरील हल्ले अस्वीकारार्ह : ठाणेदार

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंदू मंदिरांवरील हल्ले अस्वीकारार्ह   ठाणेदार
Advertisement

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा ऐतिहासिक ठरणार

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी  हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांची निंदा करत अशा घटनांना सहन केले जाऊ नये असे वक्तव्य केले आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचा  हिंदूफोबिया सहन करू नये. प्रेम, परस्परांना मदत करणे आणि चांगले काम करणे धर्म शिकवित असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. होमलँड सुरक्षा समितीत मी कार्यरत आहे. समितीच्या सदस्यांना धार्मिक संघटनांना उत्तम कार्य करण्यास मदत करण्यासंबंधी मी सांगत आहे. धार्मिक संघटनांच्या सुरक्षेसाठी आवश्यक निधी आणि साधनसामग्री प्रदान करणे अणि कुठल्याही प्रकारच्या हिंदूफोबिया, किंवा द्वेषाविरोधात लढण्यास मदत करण्यात यावी असा माझा आग्रह असल्याचे ठाणेदार म्हणाले. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा पार पडणारा सोहळा हा ऐतिहासिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

मंदिराची उभारणी हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण आहे. राम मंदिराची उभारणी होताना पाहणे प्रत्येक भारतीयासाठी गर्वाची बाब आहे. मंदिर खरोखरच भव्य अन् दिव्य असेल असे उद्गार ठाणेदार यांनी काढले. रामायणाला 15 विविध देशांसोबत पूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रात गौरविण्यात आले आहे. रामायणावर जगभरात अध्ययन केले जातेय आहे. मी एका हिंदू कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे, रामायणाचे अध्ययन करत त्यातील अनेक मूल्यांना जीवनात अंगिकारले असल्याचे ठाणेदार यांनी म्हटले आहे. राम मंदिराचे उद्घाटन अनेक देशांच्या लोकांसाठी आनंदाची बाब आहे. जसजसा कार्यक्रमाचा दिवस नजीक येतोय, जल्लोषाचे स्वरुप वाढत असल्याचे उdदगार अमेरिकेतील थायलंडचे राजदूत तनी संग्राट यांनी काढले आहेत.  राम घरी येण्याचा उत्सव साजरा केला जातोय, हे केवळ थायलंड नव्हे तर दक्षिणपूर्व आशिया आणि आशिया-प्रशांतच्या अनेक देशांच्या लोकांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे संग्राट म्हणाले. कॅपिटल हिलमध्ये ‘रामायण एक्रॉस एशिया अँड बियॉन्ड’मध्ये प्रतिष्ठित राजनयिक आणि अमेरिकेचे खासदार सामील झाले. यात  अमेरिकेतील भारताचे राजदूत, अमेरिकेचे खासदार जिम बेयर्ड, मॅक्स मिलर, श्री ठाणेदार, यांचा समावेश होता.

Advertisement
Tags :

.