केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर बिहारमध्ये हल्ला
संशयित मुस्लीम तरुण ताब्यात
वृत्तसंस्था/ बेगुसराय
बिहारमधील बेगुसराय येथे जनता दरबारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर मुस्लीम तऊणाने हल्ला केला. या हल्ल्यात गिरिराज सिंह थोडक्मयात बचावले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तऊणाने हे पाऊल का उचलले हे पोलीस पथकाच्या चौकशी व तपासानंतर स्पष्ट होईल. पोलीस त्याचा सखोल तपास करत आहेत.
बलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलिया उपविभाग संकुलात हल्ल्याची घटना घडली. मोहम्मद सैफी नावाच्या तऊणाने आधी जनता दरबार गाठून माईक ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. यानंतर त्याने काही आक्षेपार्ह बोलण्यास सुऊवात केल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. याचदरम्यान, त्याने गिरिराज सिंह यांना धक्काबुक्की केली. हल्ला करणारा तऊण बलिया उपविभागातील एका गावातील वॉर्ड नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आहे. बेगुसरायमध्ये या घटनेचा मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे. तसेच गिरिराज सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई केल्याबद्दल स्थानिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेनंतर गिरिराज सिंह यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेजस्वी यादव यांच्यासारख्या नेत्यांमुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांचे मनोधैर्य वाढले असले तरी गिरिराज सिंह हे कोणाला घाबरत नसल्याचे सांगितले.