For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होर्मुझ सामुद्रधुनीत दोन जहाजांवर हल्ला

06:23 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
होर्मुझ सामुद्रधुनीत  दोन जहाजांवर हल्ला
Advertisement

इराणने डागली क्षेपणास्त्र 

Advertisement

वृत्तसंस्था, मस्कत

आखाती क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण सागरी मार्ग होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असलेल्या जहाजांवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी क्षेपणास्त्रs डागली आहेत. इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये दोन व्यापारी जहाजांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या हल्ल्यांमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने अद्याप या घटनेवर कुठलेच अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

Advertisement

ओमानच्या लीमा भागापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ऑइल टँकरवर क्षेपणास्त्र आदळले. यामुळे टँकरला आग लागल्याची माहिती ब्रिटनच्या सागरी व्यापार संस्थेने मंगळवारी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे जहाजांनी दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत हल्ले रोखण्यासाठी अमेरिका आणि इराण दरम्यान करार झालेला असताना हे हल्ले झाले आहेत. याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिका इराणच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा विचार करत असल्याचे समजते.

तणाव कायम

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम सुरू असताना आणि दोन्ही देशांदरम्यान युद्ध पूर्णपणे समाप्त करण्यासाठी चर्चा जारी असताना हे हल्ले झाले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव यामुळे कमी होण्याची शक्यता मावळत चालली आहे. रणनीतिक स्वरुपात होर्मुझ सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वपूर्ण सागरी व्यापार मार्गांपैकी एक आहे आणि जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

Advertisement
Tags :

.