Sangli Politcs : सांगलीत शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला
सांगलीत शिवसेना नेत्यांवर खुनी हल्ल्या
सांगली : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे उपजिल्हा प्रमुख हरि लेंगरे आणि शहर प्रमुख सचिन कांबळे यांच्यावर आज सायंकाळी खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात लेंगरे यांच्या गाडीवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. संतप्त शिवसैनिकांनी संजयनगर पोलीस ठाणे गाठत संशयित हल्लेखोरांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरू केली.
दरम्यान, ऐन निवडणूकीत कुपवाड फाट्याजवळ झालेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती निरीक्षक सतीश कदम यांनी पत्रकारांना दिली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन कांबळे हे संशयितांना भेटण्यासाठी साडे सहाच्या सुमारासकुपवाड रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गेले होते. त्यावेळी त्याच्यावर दोघांनी हल्ल्यांचा प्रयत्न केला. वेळीच त्यांनी तेथून निघून गेल्याने ते बचावले.
त्यानंतर हरि लेंगरे हे त्या परिसरात सहकार्यासोबत एका हॉटेलमध्ये नाष्टा करत होते. त्यावेळी एक त्याठिकाणी आला, हरि लेंगरे याला गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात लेंगरे यांच्यासह चालक संजय सरगर हे किरकोळ जखमी झाले. चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ऐन निवडणूकीत झालेल्या घटनेमुळे जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी पोलिस ठाण्यात आले होते. संशयितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, महेंद्र चंडाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते