For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धार्मिक स्थळावर हल्ला; मणिपूरमध्ये पुन्हा तणाव

06:22 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
धार्मिक स्थळावर हल्ला  मणिपूरमध्ये पुन्हा तणाव
Advertisement

मध्यरात्री गोळीबार : केंद्रीय दलाची तुकडी तैनात

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमधील इंफाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्री एका निर्माणाधीन धार्मिक स्थळाला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. रात्री 12.30 च्या सुमारास पॅलेस कंपाऊंडमधील एका धार्मिक स्थळावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या गोळीबारात सहभागी असलेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. गोळीबार झालेल्या धार्मिक स्थळाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलाचे एक पथक तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात एकाही जवानाला इजा झाली नाही ही दिलासादायक बाब आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत मणिपूरमध्ये हिंसाचार सातत्याने कमी होत असल्याचा दावा केला होता. मात्र, येथील वातावरण पूर्णपणे शांत झाले नसल्याचे गोळीबाराच्या नुकत्याच झालेल्या घटनेवरून दिसून येत आहे. पंतप्रधानांच्या दाव्यानंतर दोन दिवसांनी राज्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे.

राज्यातील मैतेई आणि कुकी-झोमी जमातींमध्ये 3 मे 2023 पासून तणाव सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 65 हजारांहून अधिक लोकांनी घरे सोडून इतरत्र आश्र्रय घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी 11,000 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. तसेच 500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.