पोलिओ लसीकरण पथकावर हल्ला, 6 जणांचा मृत्यू
आत्मघाती स्फोटात 22 जण जखमी
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सोमवारी पोलीस लसीकरण पथकाला सुरक्षा प्रदान करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत एक स्फोट घडवून आणला गेला आहे. या स्फोटात 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बाजौर जिल्ह्यातील मामुंड येथे ही घटना घडली आहे. विस्फोटावेळी पोलीस कर्मचारी हे पोलिओ लसीकरण पथकांसोबत जात होते. स्फोटात जखमी झालेल्या लोकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व जखमी हे पोलीस कर्मचारी आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री केपीके अरशद हुसैन यांना या हल्ल्याची निंदा करत अखेरच्या दहशतवाद्याचा खात्मा होईयर्पंत हे युद्ध सुरू राहणार असल्याचे उद्गार काढले आहेत.
लसीकरण मोहिमेला विरोध म्हणून पाकिस्तानात पोलिओ लसीकरण पथकांना दहशतवादी लक्ष्य करत असतात. मांमुडे येथील हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.